आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवनीत गुर्जर
शांतियुगाचा उद्घोष करणारे जग बघत राहिल आणि दोन राष्ट्रप्रमुखांची जिद्द वा स्वार्थ कळसाला पोहोचून त्याचे एका महायुद्धात रुपांतर होईल, असे कधीही व्हायला नको. जसे आखाती युद्धाच्या वेळी झाले होते. अर्थात ते युद्धही त्या काळाच्या पन्नास वर्ष आधीपासूनचे, सर्वाधिक माहिती मिळालेले युद्ध होते, जे मोठ्या पूर्वतयारीने लढले गेले.
झाले असे होते, की इराकने अचानक कुवेतवर हल्ला करुन त्यावर कब्जा केला होता. अमेरिकेला त्यावेळी असे वाटले होते, की इराकने कुवेत नव्हे, तर जॉर्ज बुश यांचेच नाक पकडले आहे. तेव्हापासून पाच महिने उलटले होते आणि कुणी हे सांगू शकत नव्हते, की सद्दाम हुसेन किंवा जॉर्ज बुश वा सौदी अरेबियाच्या शासकांकडे याचा हिशेब करायला वेळ नव्हता, की लढाई अल्पावधीची होईल की दीर्घ, भयानक असेल की सोपी, यांत्रिक संहारानंतरचा सन्नाटा कमी करणारी असेल की आसवांच्या वाहत्या नदीत माणुसकीच्या संकल्पाची परीक्षा घेणारी असेल? सप्टेंबर १९३९ मध्ये पोलंडवर हिटलरने हल्ला केल्यानंतर जेव्हा ब्रिटनने युद्धाची औपचारिक घोषणा केली, तेव्हाही लढाई एकदम सुरू झाली नव्हती. तेव्हाही युद्धाची तयारी करण्यात असेच महिने गेले होते, जसे आखाती युद्धादरम्यान अरेबियातील वाळवंटात गेले होते. त्याला लुटूपूटूची लढाई म्हटले गेले, पण पन्नास वर्षानंतर आखाती युद्धाची घोषणा कुणी केली नव्हती. उलट युद्ध टाळण्याचे प्रयत्न दिवस-रात्र केले गेले. महाभारत टाळण्यासाठी शिष्टाई म्हणून ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते आणि सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन मिळणार नाही, असे उत्तर घेऊन परतले होते, तसेच आखाती युद्धाच्या आधीही जॅक्सन बेकर बगदादला जावून परतले होते. पेरेझ द कुइयारही निराश होऊन परतले होते, युद्ध तेव्हाही सुरू होते.
इराण आणि अमेरिकेदरम्यान सध्या युद्धाचे सावट आहे, पण ते हाईलच, हे आताच सांगता येत नाही. कारण इराणच्या सेनेत भलेही फार ताकद नसेल; पण अमेरिकेसह सर्वांना माहीत आहे, की जगातील एक तृतीयांश तेल मध्य-पूर्वेत आहे आणि या तेलाच्या ताकदीला कुठलाही देश नाकारु शकत नाही. ज्याप्रमाणे कधी काळी जपानने मंचुरियावर, इटलीने अॅबेसिनियावर आणि जर्मनीने ऑस्ट्रिया व चेकोस्लाव्हाकियावर हल्ला करुन त्यांच्यावर कब्जा केला होता, त्याप्रमाणे अमेरिकाही इराणवर कब्जा करेल आणि शीतयुद्धाच्या काळात सहसा असहाय राहणारा संयुक्त राष्ट्रसंघ यावेळीही जुन्या लीग ऑफ नेशन्सप्रमाणे धडपडत राहिल, असे आता होणार नाही. असो.
एफआयआर लिहिल्यावर पोलिस येतात, त्याप्रमाणे अरेबियाच्या वाळवंटात लाखो अमेरिकी सैनिक उगाच कुठल्या तरी हवाई सिद्धांताचे रक्षण करण्यासाठी उभे नाहीत. ते अमेरिकेचा मूलभूत राष्ट्रीय स्वार्थ असलेल्या तेलाशी जोडले गेले आहेत. जगातील सर्वांत शक्तिशाली देश विश्वाचा रक्षक तेव्हाच बनतो, जेव्हा त्या पोलिसी कामात त्याचे स्वत:चेही हित असते.
नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.