आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The Country Of 135 The Citizens Really Need More Citizens ? Raj Thackeray Criticises Home Minister Amit Shah And The Central Government

135 काेटींच्या देशाला आणखी नागरिकांची गरजच आहे काय ? गृहमंत्री अमित शहा, केंद्र सरकारवर राज ठाकरेंची टीका

9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : इतर देशांमधील नागरिकांच्या साेईसाठी आपला देश नाही. इतरांना नागरिकत्व देण्याआधी येथील नागरिकांच्या समस्या मिटवा. १३५ काेटींच्या देशाला खरच आणखी नागरिकांची गरजच काय ? भारत म्हणजे धर्मशाळा नाही, बेकायदेशीररित्या बाहेरून देशात आलेल्या लाेकांना हाकलून दिले पाहिजे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत केली.

राज ठाकरे म्हणाले की, 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभर गदाराेळ उठलेला असून हिंसाचाराच्या घटना वाढल्या अाहेत. केंद्र सरकारने मूळ मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी या कायद्याचा घाट घातला आहे. पिढ्यान् पिढ्या देशात राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांना माेर्चे काढण्याची गरज नाही किंवा त्यांना असुरक्षित वाटण्याची गरज नाही. वाढत्या लाेकसंख्येमुळे सर्व व्यवस्था फाेल ठरली अाहे. शासकीय यंत्रणा सुधारल्याशिवाय या देशाला चांगले दिवस येणार नाहीत. माणुसकीचा ठेका फक्त भारतानेच घेतलेला नाही. बाहेरच्यांना बाहेर काढून अाहे त्यांना नीट सुविधा देण्याची गरज आहे.

अमित शहांचे अभिनंदन

'देशात प्रचंड माेठी आर्थिक मंदी असताना सर्व नागरिकांचे लक्ष या कायद्याच्या निमित्ताने दुसरीकडे वळवण्यात गृहमंत्री अमित शहा यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन. मात्र, इथल्या सर्वसामान्यांच्या समस्या आधी मिटवा. आजच्या परिस्थितीला केंद्र शासन जबाबदार असल्याची टीका राज यांनी केली. आधारकार्डच्या मदतीने मतदान करू शकताे, पण देशाचे नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही, मग लाेकांना आधारकार्ड कशासाठी काढण्यास लावले.

२३ जानेवारी पक्षाचे मुंबईत अधिवेशन

पुढील वर्षी २३ जानेवारी राेजी मुंबईत मनसेचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. २३ जानेवारी रोजी दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते. त्यावर त्यांनी याच तारखेला हॉल मिळाला. त्यामुळे हा केवळ योगायोग समजावा.

यशाला बाप खूप; अपयशाला सल्लागार जास्त

राज्यात ज्या काय राजकीय घडामाेडी घडल्या, त्या मतदारांचा अपमान करणाऱ्या हाेत्या. असे काही घडेल याची कल्पना कुणालाही नव्हती. ज्यांनी पक्षांतर केले अशांना पराभूत करत जनतेने धडा शिकवला. पण, त्यानंतर ज्यांनी निवडणुका एकत्र लढल्या, त्यांनी सत्तेसाठी तडजाेडी केल्या. यश मिळाले की त्याचं श्रेय घेणारे खूप असतात. अपयशाला सल्लागार खूप असतात, असेही राज ठाकरे म्हणाले.