आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Country's TV Broadcasting Industry Grew 12% To Rs 74,000 Crore, Television Sets In 19 Crore Households

देशाचा टीव्ही प्रक्षेपण उद्योग 12% वाढीने 74 हजार कोटी रुपयांचा झाला, 19 कोटी घरांमध्ये दूरचित्रवाणी संच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : देशात दूरचित्रवाणी उद्योग १२.२० टक्क्यांच्या वृद्धीसह ६६ कोटी रुपयांहून वाढून आता ७४ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. यासोबत एका वर्षात जाहिरातीतून आलेल्या उत्पन्नातून ३,८०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जाहिरातीतून उत्पन्न वाढून २०१८-१९ मध्ये ३०,५०० कोटी रु. झाली आहे. २०१७-१८ मध्ये हे २६,७०० कोटी रु. होते.

देशात ऑल इंडिया रेडिओ(एआयआर)शिवाय मार्च २०१९ पर्यंत ३५६ खासगी एफएम रेडिओ स्टेशन कार्यरत होते. २०१८-१९ मध्ये रेडिओ उद्योगा जाहिरात देणाऱ्या उत्पन्नात ९.७४% ची वृद्धी झाली. जाहिरातीतून उत्पन्न २०१७-१८ मध्ये २१७०.०४ कोटी रु. होते. २०१८-१९ मध्ये हे वाढून २३८१.५१ कोटी रुपये झाले. ही माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा(ट्राय)चा वार्षिक अहवाल २०१८-१९ मध्ये समोर आले. अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सब्सक्रिप्शन महसूल ३९,३०० कोटी रुपये होता. हा २०१८-१९ वाढून ४३,५०० कोटी रु. झाला. देशाच्या २९.८० कोटी घरांपैकी १९.७० कोटी घरांमध्ये दूरचित्रवाणी संच उपलब्ध आहेत. हे घर केबल टीव्ही, डीटीएच, हिट्स, आयपीटीव्ही आणि दूरदर्शनच्या टीव्ही नेटवर्कशी जोडले गेले आहेत. ट्रायनुसार, दूरदर्शनचे टीव्ही नेटवर्क देशाच्या सुमारे ९२% लोकसंख्येस आपली सेवा प्रदान करते. टीव्ही युनिव्हर्समध्ये १०.३० कोटी टीव्ही, ७.२४ कोटी अॅक्टिव्ह डिटिएच आणि १५ लाख हिट्स सब्स्क्रायबरचा समावेश आहे.

देशात सध्या ६० हजार केबल ऑपरेटर

एका वर्षाच्या आत देशात १४.२७ कोटी इंटरनेट आणि १५.०७ कोटी ब्रॉडबँड सब्स्क्रायबर वाढले आहेत. सुमारे ५.७६ कोटी ग्राहकांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी(एमएनपी)साठी अर्ज केला आहे. ट्रायच्या अहवालानुसार, देशात ६० लाख केबल ऑपरेटर आहे. दूरचित्रवाणी प्रसारण क्षेत्रात ३५० प्रसारक आहेत. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अखेरीस माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या परवानगीप्राप्त ९०२ खासगी उपग्रह टीव्ही वाहिन्या आहेत. यामध्ये २२९ एसडी आणि ९९ एचडी पे टीव्ही चॅनल आहेत.

१४ कोटी युजर्स वाढले


1. एका वर्षात १४.२७ कोटी इंटरनेट व १५.०७ कोटी ब्रॉडबँड सब्स्क्रायबर वाढले आहेत
2. ५ कोटी ७६ लाख ग्राहकांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केला
3. २९.८० कोटी घरांपैकी १९.७० कोटी घरांमध्ये टीव्ही उपलब्ध होण्याचा अंदाज
4. जाहिरातीतून उत्पन्न २६,७०० कोटी रु.हून वाढून ३०,५०० कोटी झाले
5. रेडिओ जाहिरातीत ९.७४% च्या वृद्धीसह २३८१ कोटी उत्पन्न
 

बातम्या आणखी आहेत...