प्रेमविवाह करून जोडपे न्यायालयात; तणावामुळे केली बंदद्वार सुनावणी

प्रतिनिधी

Apr 09,2019 08:59:00 AM IST
जळगाव - प्रेमविवाह करून न्यायालयात हजर झालेल्या जोडप्यामुळे सोमवारी जळगाव न्यायालयात तणाव निर्माण झाला. गर्दी व तणावामुळे दरवाजा बंद करून कामकाज करावे लागले. दोघेही सज्ञान असल्याने त्यांना सोबत राहण्याची परवानगी देत पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. हे प्रेमीयुगुल २८ मार्चपासून बेपत्ता होते. मुलीला मुलाच्या कुटुंबीयांनी डांबून ठेवल्याचा अर्ज मुलीच्या आईने न्यायालयात केला होता. त्यानुसार न्यायालयाने मुलाच्या कुटुंबीयांना नोटीस बजावली होती. मुलाशी संपर्क करून दोघांना ८ एप्रिल रोजी हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सोमवारी दोघेही न्यायालयात हजर झाले हाेते. मात्र, ते येताच तणाव निर्माण झाला होता.
X
COMMENT