आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Couple Who Went For The Honeymoon Sent A Message To Home, We're Glad The Volcano Is Not Active; Then The Explosion And ...

हनीमूनसाठी गेलेल्या कपलने घरी संदेश पाठवला, आम्ही खुश आहोत, ज्वालामुखी सक्रिय नाही; तेव्हा झाला स्फोट आणि...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलँड : न्यूजीलंडच्या व्हाइट आयलंडवर हनीमूनसाठी गेलेल्या अमेरिकेचे लॉरेन अरे (32)आणि मॅथ्यू उरे (36) ने सोमवारी व्हर्जिनिया, रिचमंड येथील घरी कुटुंबियांना फोन केला की, ते आयलंडवर आहेत, तेव्हा मॅथ्यू चेष्टेत म्हणाला, तो हे पाहून खुश आहे की, ज्वालामुखी सक्रिय नाही. त्यानंतर दुपारी  ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्यामध्ये कपलला खूप भाजले. याची माहिती त्यांनी कुटुंबियांना रात्री एका व्हॉइस मेलने दिली. सोबतच जेवढे लवकर शक्य होईल तितक्या लवकर इतर माहिती देण्याचा वादा केला. त्यानंतर कुटुंबाला कोणतीही सूचना मिळाली नाही. 


32 वर्षांच्या लॉरेन उरे याची आई बारबरा बरहमने द वॉशिंग्टन पोस्टला हे सांगितले. मुलांना ज्वालामुखीमध्ये अचानक स्फोट होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्यांनी तिथे जाण्याची योजना बनवली. हे कपल रॉयल कॅरेबियन क्रूज शिपने न्यूझीलंडच्या टोरांटो डॉकयार्ड येथे पोहोचले होते. 

शिप परतले नाही म्हणून क्रूजने केला घरी फोन 


ज्वालामुखी स्फोट झाल्यानंतर न्यूझीलंड क्रूज असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन ओ'सुलीवन यांनी प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी चिंता व्यक्त केली. अमेरिकी कुटुंबाचे म्हणणे आहे की, सध्या त्यांच्याकडे कोणतीही सूचना नाहीये की, त्यांची मुले कोणत्या परिस्थितीत आहेत. त्यांना सोमवारी रात्री रॉयल कॅरेबियन इन्वेस्टिगेशनमधून मुलगी लॉरेनबद्दल कॉल आला होता. ज्यामध्ये कपल आयलँडवरून शिपवर परतले नसल्याची माहिती दिली गेली होती. त्यानंतर लॉरेनची आई बारबरा यांना मैथ्यूच्या आईने फोनवर व्हॉइसमेल आल्याचे सांगितले. 

ज्वालामुखी स्फोटाच्यावेळी 100 लोक जवळपास होते... 


व्हाइट आयलंडवर सोमवारी दुपारी अचानक ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. मंगळवार दुपारपर्यंत 8 लोक बेपत्ता असल्याचे कळाले होते. अधिकाट्यांनुसार, जेव्हा ज्वालामुखी फुटला, तेव्हा त्याच्या आसपास 100 पेक्षा जास्त लोक होते. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्नने सांगितले की, या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना लवकरात लवकर जवळच्या शहरात पोहोचवले जाईल. अपघातग्रस्तांमध्ये जास्त लोक पर्यटकच आहेत.  

12 हजार फूट उंचीवर उडाली राख... 


न्यूझीलंडची जिओसायन्स एजन्सी जीएनएसने सांगितले की, ज्वालामुखीचा स्फोट खूप कमी वेळेसाठी झाला होता. मात्र याचा धूर आणि राख आकाशात सुमारे 12 हजार फूट (3658 मीटर) उंच पोहोचली होती. मात्र आता हा ज्वालामुखी पुन्हा भडकण्याची शक्यता कमी आहे. व्हाइट आयलंडवर असलेला ज्वालामुखी खूप सक्रिय मानला जातो. शास्त्रज्ञांनी 3 डिसेंबरला ज्वालामुखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, तेव्हा याची तीव्रता एवढी नव्हती की, याने पर्यटकांना काही धोका होईल. यामुळे कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नव्हती.