आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपटू जे काम करू शकत नाही, त्याला वेगवेगळे कारण देऊन योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतो : अँड्यू स्ट्रॉस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आपल्या सर्व चांगल्या-वाईट गोष्टींचा स्वीकार करणे चांगल्या दिशेने वाटचाल करण्याचे सर्वात मोठे पहिले पाऊल असते. हा विचार इंग्लंड क्रिकेट संघाचे विश्वचषक जिंकण्यासाठीचे पाऊल ठरले. मला आठवते की, २०१५ च्या विश्वचषकातील प्रदर्शन पाहून निराश झालो होतो. नंतर थंड डोक्याने विचार केल्यावर समजले की, आमची खेळण्याची पद्धत तर सोडच, विचार करणेदेखील चुकीचे आहे. हीच कमी २०१५ नाही तर २०११ व २००७ च्या विश्वचषकातदेखील दिसली होती, जेव्हा मी संघात होतो. आम्ही त्या वेळी या कमजोरीकडे दुर्लक्ष केले, त्याचा परिणाम भोगला. आमच्या क्रिकेटपटूंची सवय असते की, एखादी गोष्टी करू शकलो नाही की त्यासाठी वेगवेगळी कारणे देत ती गोष्ट योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतो. मला आजही २००७ विश्वचषकातील काही गोष्टी आठवतात - चौकार-षटकार न मारल्याने निराश होण्याची गरज नाही. २-३ धावादेखील महत्त्वाच्या ठरतात. आता आपण सांगितलेली गोष्ट आठवतो तेव्हा कळते की, जुन्या पद्धतीच्या खेळाची वकिली करतोय, आणखी काही नाही. कसोटी खेळाडूंचा भरणा असलेला संघ घेऊन आम्ही वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी उतरतो. ते केव्हा, जेव्हा वनडेवर टी-२० क्रिकेटचा प्रभाव पडला आहे. 


२०१५ विश्वचषक संपल्यावर मी संघ संचालक होतो. इयाम मॉर्गन कर्णधार होता आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास होता. आम्ही दोघांनी मिळून संघाला चांगल्या खेळाडूंची निवड करण्याचे ठरवले, जे आधुनिक क्रिकेटच्या सर्व बाबी पूर्ण करू शकेल. असे गोलंदाज पाहिजे, जे वेग आणि स्विंगमुळे फलंदाजांच्या मनात धडकी भरवेल. जो कोणत्याही परिस्थितीत आपल्या आक्रमकतेच्या जोरावर सामन्याचे स्थिती पलटू शकेल. आता म्हणू शकता आम्ही यशस्वी ठरलो. एक गोष्ट आहे - जेव्हा आम्ही २०१५ मध्ये अॅशेस जिंकली होती तेव्हा देशांतील क्रिकेटमध्ये जल्लोषाचे वातावरण होते, जसे आता आहे. मात्र, आम्ही आपला विजय मैदानाबाहेरदेखील प्रभावित करतो हे समजू शकलो नाही. आज पुन्हा एकदा आमच्याकडे संधी आहे, आम्ही देशात खेळाची संस्कृती तयार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी. कारण आमच्या आगामी विजय काळात आणखी ऐतिहासिक विजयाचा पाया रचला जावा.