आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारकत घेण्यासाठी पत्नीचा छळ.. उद्योजक रत्नाकर गुट्टेंसह कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा, लवकरच अटक होणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- फारकत घेण्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जीचे चेअरमन व रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्यासह कुटुंबातील इतर सात जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना नोटीस बजावली असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुदामती यांनी शनिवारी परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रत्नाकर गुट्टे यांच्यासह त्यांचे बंधू अंकुश माणिकराव गुट्टे, त्यांची पत्नी सुंदराबाई, दिराची मुलगी कल्पना गुट्टे, नणंद सीताबाई मुंडे, नणंदेचा पती विष्णू मुंडे, नणंदेचा मुलगा संजय मुंडे अशा सात जणांविरुद्ध भादंविच्या 498 (अ), 323, 504, 506, 34 या कलमांअंतर्गत 11 जानेवारीला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना अटक करणार असल्याचे परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी सांगितले.

 

दीड वर्षापूर्वी केला होता आत्महत्येचा प्रयत्न
गुट्टे त्यांच्या घरात मागील सात वर्षांपासून कलह सुरूच आहे. सुदामती गुट्टे यांनी दीड वर्षापूर्वी परळीच्या उड्डाणपुलाशेजारी रेल्वे पटरीवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही कुटुंबातील कलह सुरूच राहिला.

 

रत्नाकर गुट्टेंवर आधीही अनेक आरोप
रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्यावर गंगाखेड शुगर अँड एनर्जीतून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचे आरोपही झाले होते. गुट्टे यांनी स्वतःच्या नावे सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथे इंग्लिश स्कूल व इन्स्टिट्यूट उभी केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...