आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Criminal Action Taken Directly By Nylon Manza For Flying The Kite

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडक कारवाई सुरूच, दोन दिवसांत 50 हजारांचा नायलाॅन मांजा जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. शुक्रवारी रामवाडी परिसरातील कुमावतनगर येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या घरावर छापा मारत ३० हजारांचा मांजा जप्त करण्यास २४ तास उलटत नाही तोच रविवार कारंजा परिसरातील घारपुरे घाट येथे मांजा विक्री करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. शनिवारी (दि. ५) गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडून २० हजारांचा मांजा जप्त केला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथक गस्त घालत असताना घारपुरे घाट परिसरात एक संशयित नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घारपुरे घाट, अशोकस्तंभ येथील वनसे चाळीच्या बोळीत या संशयितास नायलॉन मांजा विक्री करत असल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतल. त्याने सागर भगवान धनगर असे नाव सांगितले. घरझडतीमध्ये २० हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला. संशयिताविरोधात सरकारवाडा पोलिसात पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, महेश कुलकर्णी, पोपट कारवाळ, आसिफ तांबोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. रविवार कारंजा परिसरातील घारपुरे घाट येथे मांजा विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली. या विक्रेत्याकडून २० हजारांचा मांजा जप्त करण्यात आला. 

 

पाेलिसांची आता पालकांवर नजर 
कारवाई करण्यात आलेल्या संशयिताकडून मांजा विक्री करण्यात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे. मांजा खरेदी करणाऱ्यांमध्ये बहुतांशी लहान मुले असल्याने आता या मुलांच्या पालकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

 

सिडकाेतील छापा, नायलाॅन मांजा विकणारा जेरबंद 
नायलॉन मांजावर बंदी असताना शिवाय याबाबत जनजागृती सुरू असताना काही बेजबाबदार व्यक्तींकडून घरात छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अंबड पोलिसांनी कारवाई करत एक अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मांजा जप्त केला आहे. 

 

अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. शुभम पार्क परिसरातील गजानननगर येथील साईलीला रोहाउस नायलॉन मांजाची विक्री सुरू हाेती. वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय पवार यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी एका अल्पवयीनासह संशयित राहुल भागवत जाधव (२६ ) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून हजारो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे

 

पालिका शाळांत देणार विद्यार्थ्यांना शपथ 
'दिव्य मराठी'ने सुरू केलेले नायलाॅन मांजा जनजागृती अभियान अतिशय स्वागतार्ह आहे. घातक नायलाॅन मांजाचा वापर पतंग उडविण्यासाठी करणार नाही, अशी शपथ महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये महापालिकेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. -राधाकृषण गमे, आयुक्त, महापालिका 

 

पर्यावरण भक्षकांकडून नामी शक्कल 
न्यायालयाच्या आदेशान्वये नायलॉन मांजा विक्री अथवा वापर करण्यास बंद असल्याने पर्यावरणाचे भक्षकांवर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी या समाजकंटकांनी चक्क सोशल मीडियाचा वापर करत नायलॉन मांजा विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या सर्व विक्रेत्यांवर सायबर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. 

 

शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळात पतंग उडवण्यास सुरुवात झाली आहे. संक्रांतीमध्ये पतंग अडवण्याचे प्रमाण अधिक वाढते. यामध्ये नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे केला जातो. घातक मांजा वापरण्यास शासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांकडून तीन ठिकाणी छापे टाकत नायलॉन मांजा जप्त केला. तीन विक्रेत्यांवर कारवाई केली. या कारवाईचा धसका घेत विक्रेत्यांनी सोशल मीडियावर मांजा विक्री करण्याचा डाव सुरु केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर पथकाने शोध घेतला मात्र संशयित मिळून आले नाही. या संशयितांवर आता सायबर पोलिसांकडून नजर ठेवली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

 

सायबर पेट्रोलिंगद्वारे नजर 
संशयितांवर सायबर पेट्रोलिंगद्वारे नजर ठेवली जात आहे. सोशल मीडियावर पतंग आणि मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.