आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील संचारबंदी दोन दिवसांनंतर मागे; उसळलेल्या हिंसाचाराममुळे लागू करण्यात आली होती संचारबंदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - पुलवामात सुुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवाद्याच्या खात्म्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराममुळे श्रीनगर व काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. रविवारी ही संचारबंदी हटवण्यात आली. 


दोन दिवसांपूर्वी बारा तास चकमक सुरू होती. त्यात दहशतवादी जाकिर मुसा याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलास यश मिळाले. निदर्शने व चकमकीनंतर श्रीनगर तसेच दक्षिण काश्मीरच्या अनेक भागांत दक्षता म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली होती. रविवारपासून पुन्हा इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे जास्त स्पीड असलेले इंटरनेट तूर्त उपलब्ध होणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून खोऱ्यात ठप्प असलेली रेल्वे सेवाही पूर्ववत झाली. दक्षिण काश्मीरमधील त्राल, अनंतनाग तसेच इतर काही शहरांतील निर्बंधही मागे घेण्यात आले आहेत. संवेदनशील भागात मात्र सुरक्षा दल तैनात राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले .

 

मुख्य मार्ग खुला
चकमकीनंतर येथील मुख्य नल्लामार मार्गावर तारा टाकून तो बंद करण्यात आला होता. मात्र आता या काटेरी तारा हटवण्यात आल्या आहेत. वाहतूकही पूर्ववत झाली आहे. रविवारी बाजारपेठेतही वर्दळ वाढल्याचे दिसून आले.