आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The Dagadushethalwai Temple Does Make Big Food Campaign, Instead Provides Meal To Patients At Government Hospital Twice In A Day

दगडूशेठ मंदिर भंडारा करत नाही; सरकारी रुग्णालयात १२०० रुग्णांना रोज दोन्ही वेळा जेवण, ५०० गर्भवतींना रोज दिले जातात पौष्टिक लाडू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : मंदिर म्हणजे पूजा-अर्चा, दान-दक्षिणा व देणग्या, पण पुण्याचे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर थोडे वेगळे आहे. बहुधा एखाद्या भक्ताच्या नावाने ओळखले जाणारे देशातील हे एकमेव मंदिर लोकांची सेवा करत आहे. दगडूशेठ हलवाई नावाच्या व्यक्तीने सव्वाशे वर्षांपूर्वी हे मंदिर स्थापन केले होते. मंदिर दरवर्षी १५ कोटी रुपयांची सामाजिक कामे करते. वेगवेगळ्या मंदिर ट्रस्टची देशात अनेक रुग्णालये आहेत, पण दगडूशेठ मंदिराने वेगळे रुग्णालय स्थापण्याऐवजी पुण्याच्या सरकारी ससून रुग्णालयालाच कर्मस्थळ बनवले आहे. मंदिर तेथे रोज १२०० रुग्णांना दोन्ही वेळचे जेवण, चहा, नाष्टा देते. मंदिराने २०१६ मध्ये तेथे गर्भवती महिलांच्या पाच वॉर्डांचे नूतनीकरण केले, तसेच ७० शिशूंच्या क्षमतेचे एनआयसीयू आणि आयसीयू तयार केले. ट्रस्ट रुग्णांच्या नातेवाइकांच्या राहण्याची-जेवणाची व्यवस्थाही करते.

ट्रस्टच्या महेश सूर्यवंशींनी सांगितले की, मंदिर २० वर्षांपासून सामाजिक काम करत आहे. देणग्या वाढल्या तशी कामेही वाढली. २०१२ पासून आम्ही रुग्णालयात रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना भोजन आणि नाष्टा देत आहोत. मंदिर महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करत नाही, त्याऐवजी दरवर्षी साडेतीन कोटी रुपयांचे अन्नदान करते. आम्ही ५०० गर्भवती महिलांना रोज शेंगदाण्याचे लाडू वाटतो. ट्रस्टी हेमंत रासणे यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त पुरंदर तालुक्याच्या निवळी, पवारवाडी, नलावडेवाडी, पिंगोरी गावांत ट्रस्टने गेल्या वर्षी जनावरांसाठी चाऱ्याची सोय केली होती. पिंगोरीत नवे तलाव बनवले, जुन्या तलावांतील गाळ काढला. आज गावात ५१ कोटी लिटर पाणी साठवले जाऊ शकते. आम्ही ८० एकर जमिनीवर ठिबक सिंचनासाठीही मदत केली. २०१६ मध्ये ट्रस्टने पुण्याच्या ५०० गणेश मंडळांसह खडकवासला धरणातून गाळ काढला होता. मंदिराने अलीकडेच सांगली, कोल्हापुरात पूरग्रस्त एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे १० कोटींची कामे केली जातील. सरकार ज्या गावात सांगेल तेथे कामे केली जातील.

देणग्यांतून सरकारी रुग्णालयात नवजात बालकांसाठी एनआयसीयू बनवले आहे. मंदिर ट्रस्टने सुरू केलेली रुग्णवाहिका सेवा २४ तास पुण्यात मोफत व राज्यात फक्त डिझेलच्या खर्चावर चालते.

देणग्यांमधून सरकारी रुग्णालयात महिला-शिशूंसाठी विशेष वॉर्ड स्थापन...
५५० गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, प्रत्येकावर दरवर्षी १८-२० हजार खर्च
जय गणेश ज्ञानवर्धन मोहिमेअंतर्गत मंदिर ट्रस्टने ५५० गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे, त्यात प्रत्येक मुलावर दरवर्षी १८ ते २० हजार रुपये खर्च केला जातो. आतापर्यंत दोन हजारांवर मुलांना ट्रस्टने मदत केली आहे. इंदापूरमध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ३०० चौरस फुटांची पक्की घरे बांधून दिली आहेत. पुण्याच्या येवलेवाडीत ३०० कुटुंबांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी ट्रस्टने मदत केली आहे. ट्रस्टने पंढरपूर वारीच्या मार्गावर वड, पिंपळ, चिंच आणि लिंबाची ५० लाख रोपेही लावली आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...