आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी पॉलिथीनच्या पिशवीत बसून नदी पार करतात मुले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनोई- उत्तर व्हिएतनामच्या हुओई गावातील मुले पावसाळ्यात कपडे ओले करण्याची गरज पडू नये म्हणून जीव धोक्यात घालून नदी पार करतात. पावसाळ्यात जेव्हा नाम मा नदी पूर्ण भरते, तेव्हा मुलांना एका पॉलिथिनमध्ये टाकून नदी पार केली जाते. 

 

गावातील मुख्य व्यक्तीवो गोइंगचे म्हणने आहे की, "हे अत्यंत धोकादायक आहे, पण आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये. पावसाळ्यात नाम मा नदीची पातळी वाढते आणि बांबुपासून तयार केलेला पुल तुटून जातो. अशात नदी पोहूनच पार करावा लागतो. त्यामुळे मुलांचा युनिफॉर्म ओला होऊ नये म्हणून हा पर्याय अवलंबला जातो." 


एरवी राफ्टचा उपयोग करतात
गोइंग म्हणतात की, पोलिथीनमध्ये नदी पार करणे हे अत्यंत धोकादायक आहे. मुले वाहून जाण्याचा किंवा पॉलिथीनमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे बेशुद्ध होण्याची भीती असते. धोका तेव्हा वाढतो, जेव्हा नदीची पाणी पातळी वाढते आणि नदीत जास्त चिखल भरतो. अशावेळेस काहीही होउ शकते.

बातम्या आणखी आहेत...