• Home
  • Gossip
  • The dangerous stunts of Jacqueline Fernandez on the mountain and the sea, video goes viral.

Bollywood / डोंगर आणि समुद्राच्यामध्ये जॅकलिन फर्नांडिसचा हा खतरनाक स्टंट पाहून तुमचा स्वास थांबेल, व्हिडीओ झाला व्हायरल 

जॅकलिनचा हा व्हिडीओ तीन लाखवेळा पाहिला गेला आहे... 

दिव्य मराठी वेब टीम 

May 11,2019 02:32:00 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या भले चित्रपट जगतापासून दूर असेल पण ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. जॅकलिन आपल्या मस्तीच्या स्टाईलमध्ये फोटोज आणि व्हिडीओज इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर करते. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये जॅकलिन असा खतरनाक स्टंट करताना दिसत आहे की, पाहणाऱ्यांचे स्वास थांबतील.

जॅकलिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती समुद्र डोंगर यांच्यामध्ये दोरीने लटकलेली दिसली. घाबरण्याचे कारण नाही... झाले असे की, जॅकलिन त्या व्हिडिओमध्ये ट्रॅकिंग करताना दिसत आहे. यादरम्यान तिच्यासोबत एक ट्रेनरदेखील तेथे आहे. जो तिला पूर्णपणे सांभाळत आहे. जॅकलिनचा हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे तीन लाखवेळा पाहिला गेला आहे.

I do my own stunts 🙈 @danielocicero #malibu

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर जॅकलिन 2018 मध्ये सलमानसोबत ‘रेस 3’ मध्ये दिसली होती. ही फिल्म काही खास प्रदर्शन करू शकली नाही पण त्यातील जॅकलिनचे एक गाणे 'हीरिए' खूप फेमस झाले होते. याव्यतिरिक्त जॅकलिनने माधुरी दीक्षितचे जुने सॉन्ग ‘एक दो तीन’ च्या रीमेकमधेही डान्स केला होता. हे गाणेही खूप प्रसिद्ध झाले होते.

X
COMMENT