आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेससोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचा 23 वर्षांनी मोठा पती, प्रकरण ऐकून अंगावर येईल शहारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मा लक्ष्मी हिने तिच्या वैवाहिक आयुष्यासंबंधी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 'लव्ह, लॉस अँड व्हॉट वी एट' या आपल्या पुस्तकात पद्मा लक्ष्मीने तिच्या आणि सलमान रश्दी यांच्या नातेसंबंधांबाबतच्या धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत.  


पद्मा लक्ष्मीचे लग्न सलमान रश्दींसोबत झाले होते. 1998 मध्ये ती रश्दींना भेटली. तेव्हा ती 28 वर्षांची होती आणि मॉडेलिंग-अॅक्टिंगच्या करिअरसाठी तिचा संघर्ष सुरु होता. त्यावेळी रश्‍दी 51 वर्षांचे होते. पद्माने सांगितले, की जेव्हा ती लॉस एंजिलसमध्ये राहत होती, तेव्हा पहिल्यांदा रश्दी यांनी तिला फोन केला होता. या दोघांमध्ये 23 वर्षांचे अंतर होते. पहिल्याच डेटमध्ये ते तिला बेडरुममध्‍ये घेऊन गेले होते. 2004 मध्ये त्यांचा विवाह झाला होता पण आता दोघे विभक्त झाले आहेत. पद्मा लक्ष्मीने सांगितले की, रश्दी तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचे. पद्मा ही रश्‍दींची तिसरी पत्नी होती. 

 

पद्मा लक्ष्मीने केलेले खुलासे... 
- सलमान रश्दींविषयी पद्मा लक्ष्मीने म्हटले, की एकदा तिने सलमान रश्दीसोबत सेक्स करायला नकार दिला, त्यावर सलमान यांनी तिला उत्तर दिले होते, "तुझ्यासोबत लग्न करुन मी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली."
- पुस्तकात पद्माने खवय्येगिरी, कुटुंब, आव्हाने आणि आपल्या यशाबाबतचे आश्‍चर्यचकित करणारे खुलासे केले आहेत. 
- रश्दी यांना प्रत्येक क्षणाला काळजी, चांगले जेवण आणि शारीरिक संबंध हवे असत, असे पद्माने सांगितले. 
- त्यांना इतरांची परिस्थिती समजत नसे. असा स्थितीत त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणे त्रासदायक ठरत होते. 
- विवाहानंतर पद्मा लक्ष्मीला एंडोमेट्रायोसिस आजारावर जडला होता. या आजारात गर्भाशयाबाहेर टिश्‍यू निर्माण होतातयामुळे प्रचंड वेदना होतात. या आजारावर ती उपचार घेत होती. याच काळात रश्दी यांनी तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तिला प्रचंड वेदना होत होत्या. नकार दिल्याने रश्‍दी नाराज झाले होते. 
- दुस-या दिवशी ते एका दौ-यावर निघून गेले आणि पद्मा एका वकीलाकडे. तिने विवाह संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. 

 

कोण आहे पद्मा लक्ष्मी 

- पद्मी लक्ष्मी भारताची पहिली सुपरमॉडल आहे. तिने मिलान, इटली, पॅरिस आणि न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी रँप वॉक केला आणि त्यासोबत इतर भारतीयांसाठीचा मार्ग मोकळा केला.
- तमिळ असलेल्या पद्मा लक्ष्मीचा जन्म चेन्नईमध्ये झालेला आहे. 
- तिचे सुरुवातीचे आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेले, तिथे पद्मा लक्ष्मीला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. 
- लहानपणापासून पद्मा लक्ष्मी स्वतःचा तिरस्कार करत मोठी झाली. 
- माद्रिदमध्ये एका एजन्सी मॅनजरची तिच्यावर नजर पडली आणि अल्पावधीत ती यूरोपियन फॅशन सर्कलमध्ये प्रसिद्ध झाली. 
- नंतर पद्मा लक्ष्मीने चित्रपटांमध्ये, हॉलिवूड आणि यूरोपियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले काम केले. 
- कॅमेरासमोर पद्मा लक्ष्मी तिची स्टाइल, ग्लॅमर व्हॅल्यू आणि कॉन्फिडन्स यासाठी ओळखले जात होते. 

 

बातम्या आणखी आहेत...