Maharashtra Pecial / अमरावतीतमधील हिंदू स्मशानभूमीतील नवजात बाळाचे पुरलेले प्रेत चोरीला, काही दिवसांपूर्वी अस्थी झाल्या होत्या गायब

बाळाचे वडील सहजच आपल्या बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता...

दिव्य मराठी वेब टीम

May 10,2019 12:40:00 PM IST

अमरावती- अमरावतीमधील ‘हिंदू’ स्मशानभूमीतून नवजात बाळाचे पुरलेले प्रेत चोरीला गेल्याचा घटना समोर आली आहे. मृत बाळाचे वडील अमोल नागपूरकर यांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

नागपूरकर यांच्या बाळाचा जन्म झाल्याच्या 24 तासात मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू 25 एप्रिलला झाला, त्यानंतर त्यांनी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी बाळाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करुन हिंदू स्मशानभूमीत मृतदेह पुरला. त्यावेळी स्मशानभूमीतील कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी नागपूरकर यांना कळाले की, काही दिवसांपूर्वी हिंदू स्मशानभूमीतून मृतदेहाच्या अस्थी चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागपूरकर यांनी सहजच आपल्या बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले. स्मशानभूमीत जाऊन त्यांना धक्का बसला.

बाळाचा मृतदेह पुरलेला होता, त्या ठिकाणी खड्डा खोदलेला होता आणि बाळाचा मृतदेह गायब होता. त्यांनी याबाबत स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पण, त्यांना समाधनकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

X
COMMENT