आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गदाना वीज उपकेंद्रामध्ये ७ तास ठेवला मृतदेह, आश्वासनानंतर घेतला ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद-शॉक लागून  मृत्यू झालेल्या विरमगाव (ता. खुलताबाद) येथील अशोक शेकू आधाने (३६) यांचा मृतदेह गदाना येथील उपकेंद्रात गावकऱ्यांनी सात तास ठेवलेला होता. जोपर्यंत मृताच्या मुलाला नाेकरीत सामावून घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती.  वातावरण चिघळत असल्याचे पाहून शेवटी ७ तासानंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले व विरमगावच्या ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले.

 

अशोक आधाने हा ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत खांबरवर काम करताना २९ ऑक्टाेबर २०१६ रोजी शॉक लागून पडल्याने  गंभीर जखमी झाला होता. त्याला  मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पाठीच्या मणक्यावर शास्त्रक्रिया केल्यानंतर  पुढील उपचारासाठी पुन्हा औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले होते. लाखो रुपये खर्च करूनही अशोक वाचू शकला नाही. शनिवारी अशोकने शेवटचा श्वास घेतला.  संतप्त गावकऱ्यांनी अशोकचा मृतदेह सकाळी ११ वाजता गदाना उपकेंद्रात घेऊन आले. दरम्यान, खुलताबाद तालुका उपकार्यकारी अभियंता उस्मान खान उपकेंद्रावर दाखल झाले. तेंव्हा संतप्त जमावाने त्यांना घेराव घातला  लेखी आश्वासन द्या, तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेणार अशी भूमिका विरमगावच्या गावकऱ्यांनी घेतली. सायंकाळचे ५ वाजले तरी कोणतेही आश्वासन मिळत नसल्याने जमावाने उपकेंद्राची तोडफोड केली. हे पाहून विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयाच्या स्वच्छतागृहात घुसले व आतील दरवाजा बंद करून वातावरण शांत होण्याची वाट पाहू लागले. दुसरीकडे जमावाने फुलंब्री-खुलताबाद मार्ग काही काळ बंद केला होता. तत्काळ मृताच्या मुलाला नाेकरीत सामावून घेण्यासाठी आश्वासन द्या, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

बातम्या आणखी आहेत...