आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्याने मृतदेह 2 तास ठेवला ताटकळत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने दोन तास मृतदेहाला ताटकळत ठेवण्याची वेळ बुधवारी दुपारी आली. पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत दुसरा मृतदेह आल्याने त्याही मृतदेहासाठीही लाकडांचा प्रश्न उद्भवला. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.


नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरवणे महापालिकेने बंद केले आहे. यावर उपाय म्हणून शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी खासगी पातळीवर मक्तेदार नेमून ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडे देण्यासाठी व्यवस्था केली आहे. वनविभागाने अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी साॅमिल चालकांकडे येणाऱ्या मालाची तपासणी सुरू करून दंडाची कारवाई करण्यात येत अाहे.

 

त्यामुळे व्यापाऱ्यांकडून गेल्या अाठवड्याभरापासून लाकडांचा पुरवठा हाेत नाही. शहराला अाैरंगाबाद व धुळे जिल्ह्यातून व्यापाऱ्यांकडून लाकडांचा पुरवठा हाेत हाेता. ताेही बंद अाहे. बुधवारी सकाळी १० वाजता दादावाडी परिसरातील मीराबाई विठ्ठल वडेड्डीवार(वय ७५) यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. या वेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडेच नसल्याचे सांगण्यात अाले. त्यांच्या नातेवाइकांना स्वत: साॅमिलमधून लाकडे विकत घेण्यास सांगण्यात आले. या वेळी मृतांच्या नातेवाइकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर त्यांनी आमदार भाेळे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी शेजारील वखारीतून लाकडे देण्याची व्यवस्था केली. याला दुपारचे १२ वाजले. त्यानंतर मीराबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात अाले. हे सुरू असतानाच स्मशानभूमीजवळ राहणारे शंकर पंडित कोळी (वय ४०) यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत अाली. या वेळीही लाकडांचा प्रश्न उद्भवला. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनीही संताप व्यक्त केला.


लाकडांचा पुरवठा करणाऱ्या मक्तेदाराला जाब विचारताना मृताच्या नातेवाइकांसह शहरातील सामाजिक कार्यकर्ते.वनखात्याच्या अडकावचा केला जाताेय बनाव; खासगी मक्तेदाराला धरले धारेवर स्मशानभूमीतील खासगी मक्तेदार राजेंद्र चिंधू काेल्हे यांनी वनखात्याकडून अडवणूक हाेत असल्याने व्यापारी लाकडांचा पुरवठा करीत नसल्याचे सांगितले. दरम्यान, वनविभागाचे एन.जे. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्मशानभूमीसाठी लाकडे पुरवणाऱ्या काेणत्याही व्यापाऱ्याची अडवणूक करण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे वनखात्याचा अडकाव असल्याचा बनाव केला जात असल्याचे उघड झाले.

बातम्या आणखी आहेत...