आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७ वर्षांतील सर्वात भीषण वादळ, २५ जणांचा मृत्यू; टेनेसीत आणीबाणी

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
छायाचित्र नॅशव्हिले विमानतळाचे आहे. वादळामुळे विमान कोसळले. यातील प्रवाशांचा मृत्यू झाला. जवळ उभ्या विमानांचेही नुकसान झाले. - Divya Marathi
छायाचित्र नॅशव्हिले विमानतळाचे आहे. वादळामुळे विमान कोसळले. यातील प्रवाशांचा मृत्यू झाला. जवळ उभ्या विमानांचेही नुकसान झाले.
  • अमेरिकेत १९९१ आणि २०१५ च्या तुलनेत या वर्षी दुप्पट वादळे आली

वॉशिंग्टन- अमेरिकेतील टेनेसी राज्यात आलेल्या भीषण वादळात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे नॅशव्हिलेमध्ये ५० पेक्षा जास्त इमारती उद्ध्वस्त झाल्या तर विजेचे खांब कोसळले. आपत्ती अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात २०१३ नंतर असे भीषण वादळ आले.
राज्यात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. वादळामुळे डेव्हिडसन, विल्सन, पुतनाम आणि जॅक्सन काउंटीत ७३ हजार घरे आणि इमारतींमधील वीज गुल झालीय. राष्ट्रीय हवामान  सेवेने ट्विटद्वारे इशारा दिला आहे की, हे खूप धोकादायक वादळ आहे. सुरक्षित ठिकाणी रहा. गर्व्हनर बिल ली यांच्यानुसार मरणाऱ्यांची संख्या २५ झाली आहे. महापौर जॉन कूपर यांनी सांगितले की, सुमारे १५० जणांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.


नॅशव्हिले विमानतळाचेही मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी लवकरच या भागाचा दौरा करणार. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व शाळांना सुटी दिली आहे. टेनेसीत प्राथमिक निवडणूक होती. बूथ हलवण्यात आली.

अमेरिकेत १९९१ आणि २०१५ च्या तुलनेत या वर्षी दुप्पट वादळे आली


हवामान संस्थांनुसार, भीषण चक्रीवादळाची टेनेसीतील ही दुसरी सर्वात मोठी घटना आहे. यापूर्वी २२ मार्च १९५२ ला टेनेसीमध्ये ३८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ५ फेब्रुवारीला २००८ ला २२ जणांचा मृत्यू झाला होता. अॅक्युवेदरनुसार या वर्षी अमेरिकेत वादळांमध्ये सरासरीपेक्षा जास्त (१४१) वाढ झाली आहे. ही १९९१ व २०१५ ची सरासरी ६८ पेक्षा दुप्पट आहे. 

बातम्या आणखी आहेत...