आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - मूळव्याधीची शस्त्रक्रिया करताना २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मुकंुदवाडी भागात घडली. हेमा अनिल वाघमारे (२३, रा. इंदिरानगर, मुकुंदवाडी) असे तिचे नाव आहे. मुकुंदवाडी येथील सुखायू सुश्रुत आयुर्वेदिक मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला. रात्री उशिरा तिचे कुटुंब मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.
हेमाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, तिने धुळे येथे डी. फार्मचे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ती भालगाव येथील भय्यासाहेब टोपे महाविद्यालयात बी. फार्म.च्या अंतिम वर्षाला होती. दोन महिन्यांपासून तिला मूळव्याधीचा त्रास होत होता. त्यामुळे तिने सुखायू सुश्रुतमधील डॉ. शिवकुमार गोरे (बीएएमएस) यांच्याकडे उपचार सुरू केले. हेमावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पण तिची परीक्षा सुरू असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलली. मग हाॅस्पिटलतर्फे अत्यल्प खर्चात शस्रक्रिया शिबिर होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे तिच्या कुटुंबाने शुक्रवारी (३१ मे) शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. अवघ्या सहा ते सात मिनिटांमध्ये डॉक्टर बाहेर आले. तिची प्रकृती बिघडली असून तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागेल, असे सांगितले. आई-वडिलांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे तिला घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला मिळाला. घाटीत पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला.
भीतीमुळे कार्डियाक अटॅक आला असावा
हेमा वाघमारे हिला टेस्टसाठी भुलीचे (झायलाेकेन)०.२ मिलीलिटरचे इंजेक्शन दिले हाेते. मात्र या टेस्टनंतर तिची नाडी संथ चालू लागल्याने आम्ही तिला तातडीने डाॅ. अजय दंडे यांच्याकडे रेफर केले. मात्र डाॅ. दंडे यांनी रुग्णाला घाटीत हलवण्याचा सल्ला दिला. हेमाला भीतीमुळे कार्डियाक अटॅक आला असण्याची शक्यता आहे.
-डाॅ. शिवकुमार गाेरे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.