आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टाग्रामवर २४ लाख फॉलोअर्स असलेल्या मांजरीचा मृत्यू; नासाने वाहिली श्रद्धांजली

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन -  गोल गोल डोळे व लटकणारी जीभ यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धीस आलेल्या अमेरिकी मांजरीचा वयाच्या ८ व्या वर्षी मृत्यू झाला. इन्स्टाग्रामवर तिला २४ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. या मांजरीची मालकीण माइक ब्रिडावस्की यांनी इन्स्टाग्रामवर तिच्या निधनाची माहिती दिली. ब्रिडावस्की म्हणतात, बब हिने चिरनिद्रा घेतली. बबच्या जन्मापासून तिने अडचणीचा सामना केला. तिला खुजेपणाची व्याधी होती. तिच्या हाडाला संसर्ग झाला होता. बबने तिच्या आयुष्यात प्राण्यांवर उपचार व मदतीसाठी ५ कोटी रुपये (७ लाख डॉलर) गोळा करण्यासाठी मदत केली होती. बबच्या मृत्यूनंतर नासाने टि्वट करताना म्हटले, “आम्ही स्पेसमध्ये भेटू. प्रिय बब, तुझा प्रवास सुखाचा होवो.’  ब्रिडावस्कीला लिल बब सुमारे दोन महिन्यांची असताना भेटली होती. तेव्हापासून ती तिच्याजवळच असायची. 
लिल बबवर “लिल बब अँड मॅजिक; ए साउंडट्रॅक टू द युनिव्हर्स’ नावाचा माहितीपटही येऊन गेला आहे. बबवर संगीत अल्बमही काढण्यात आला होता. याशिवाय “स्नूप डॉग ऑन म्यू द ज्वेल्स’ नावाचा रिमिक्स अल्बम आलेला होता. सोशल मीडियावर तिचे सर्वप्रथम छायाचित्र टम्बलरवर ती दोन महिन्यांची असताना प्रसिद्ध झाले. यानंतर रेडिटने तिला पहिल्या पानावर स्थान दिले. त्यानंतर ती इतकी प्रसिद्धीच्या झाेतात आली की तिची मालकीण माइक ब्रिडावस्की यांनी तिचे छायाचित्र असलेले टीशर्ट्स, कॅलेंडर्स आदींची विक्री सुरू केली. त्यातून मिळालेली रक्कम अॅनिमल रेस्क्यू ग्रुप व अॅडाॅप्शन सेंटरला देण्यात आली.