आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Death Of The Father Before The Marriage, The Marriage Was Done By The Son Just To Fulfill Father's Wishes

लग्नापूर्वी पित्याचा मृत्यू, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने मृतदेहासमाेरच केले लग्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विल्लुपुरम  - तामिळनाडूच्या विल्लूपुरममध्ये मुलाचे लग्न लागण्याआधीच वरपित्याचे निधन झाले. परंतु हे लग्न व्हावे, अशी त्यांची शेवटची इच्छा होती. त्यामुळे मृतदेह घरातच ठेवून वर-वधूचा विवाह पार पडला.  ही विचित्र घटना टिंडिवनम भागातील सिंगनूर गावातील आहे. यासंदर्भात माहिती अशी की, डी. अलेक्झांडरचे लग्न २ सप्टेंबरला होणार होते. शुक्रवारी अलेक्झांडरचे वडील देवमणी यांचे अचानक निधन झाले.  देवमणी मुलाचे लग्न ठरल्याने खूप आनंदात होते. त्यांनी जोमात तयारीही सुरू केली होती. मुलाचे लग्न धामधुमीत व्हावे व आपण हा सोहळा डोळ्यांनी पाहावा, अशी त्यांची इच्छा होती. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. घरातील मंडळी सुन्न झाली. दरम्यान अलेक्झांडरने (३१)वडिलांचा अंत्यविधी करण्यापूर्वी आपण लग्न उरकून घ्यावे, असे ठरवले.वधू अन्नपूर्णाशी (२७)त्याने विचारविनिमय केला आणि तिने संमती देताच लग्नाची तयारी सुरू झाली. दोन्ही पक्षांनी लग्नाची तयारी केली.