आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवार म्हणतात, भाजपसोबत जाण्याचा निर्णय आधीच झाला होता, आता मला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न -रिपोर्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या पाठींब्याबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई- बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला पाठींबा देण्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी बारामतीमधील आपल्या कार्यकर्त्यांसमोर भाजपला पाठींबा का दिला याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिणीला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली.




कार्यकर्त्यांना सांगताना अजित पवार म्हणाले की, "पक्षातील जेष्ठ नेते मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपसोबत जायचे, असे काही महिन्यांपूर्वीच ठरले होते. त्यासंदर्भात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या. पण, मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय", असे अजित पवारांनी सांगितले. तसेच, गुप्त मतदार झाले तर आपण जिंकणार, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. "मला आमच्या नेत्यांकडून गप्प बसायला सांगितले जात आहे, पण वेळ आल्यावर सर्व बोलणार", असा इशारा अजित पवारांनी दिला.



162 आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना सुपूर्द
 
सत्ता स्थापनेवरून वाद सुरू असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या 162 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सोमवारी राज्यपालांना सुपूर्द केले. महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपने स्वतः मान्य केले होते की त्यांच्याकडे बहुमत नाही. तरीही बहुमत नसताना सीएम पदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीची पायमल्ली केली असे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोबतच, फडणवीस यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...