आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाला वाहिलेली फुले आधी फेकून देत असत; आता त्या रंगातून रंगवलेल्या खादीच्या कपड्यांना परदेशातही मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- मंदिरात देवाला वाहिलेली फुले आधी फेकून दिली जात असत. आता त्यापासून नैसर्गिक रंग तयार करून खादीचे कपडे त्यात रंगवले जातात. त्यामुळे कापड उठून दिसते आहे. यामुळे किमान दोन डझन बायांचा संसार चालतो आहे. 

 

हे तंत्र बंगळुरू येथून निफ्टचे शिक्षण घेतलेल्या गयाचे प्रवीण चौहान यांनी आत्मसात केले आहे. त्यांनी बोधगया येथील महाबोधी मंदिरातून फेकल्या जाणाऱ्या फुुलांचा नैसर्गिक रंग काढून त्यात खादीचे कपडे रंगवतात. हे कापड आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत विक्रीस पाठवत आहेत. त्यांच्या संचात ३० महिला आहेत. त्या दोन दिवसांत सुमारे ५०० किलो फुलांपासून ३० किलो पाकळ्या गोळा करतात. त्यातून एक किलाे पावडर मिळते. 

 

या एक किलो पावडरने १०० मीटर खादीचे कापड रंगवले जाते. त्यातून या महिलांना ६ ते १२ हजार रुपये दरमहा कमाई होते. प्रवीण यांची संस्था मातृ व ऑस्ट्रेलियन संस्था बिकॉज ऑफ नेचर यांनी मिळून द हॅपी हँड प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यांना ऑस्ट्रेलियाची डाय एक्सपर्ट कॅथी विल्यम साथ देत आहे. या कपड्यांना जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात खूप मागणी आहे, असे प्रवीण चौहान यांनी सांगितले. 

 

बोधी वृक्षावरील श्रद्धा पाहून सुचली कल्पना
महाबोधी विहारावर भाविकांची असलेली श्रद्धा पाहून प्रवीण यांना ही कल्पना सुचली. बोधीवृक्षाच्या एका पानासाठी लोक येथे येतात. जर मंदिरात वाहिलेली फुलांचा अंश कपड्यात असेल तर याची मागणी बौद्ध अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणावर असेल. मग त्यांनी विहाराच्या व्यवस्थापन समितीशी एमओयू साइन करून प्रकल्प सुरू केला.  

बातम्या आणखी आहेत...