आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेत तुमच्या छातीवर कधी भूत बसलंय का? तर मग जाणून घ्या या भूताचं नाव !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क - तुमच्यासोबत असं कधी झालंय का की, एखादे स्वप्न पाहताना अचानक अर्ध्या रात्री तुमचा डोळा उघडतो, पण जाग येऊनसुद्धा तुम्ही तुमचे हात-पायच काय शरीराचा कोणताही अवयव हलवू शकत नाहीत. अंथरुणावरच खिळून राहतात. आणि तुम्हाला तुमच्या छातीवर काहीतरी विचित्र दबाव असल्याची जाणीव होते. तुम्हाला असे वाटते की, एखादी गोष्ट तुम्हाला हलण्यास किंवा बेडवरून उठवण्यास अटकाव करत आहे. किंवा एखादी भीतिदायक आकृती तुमच्या छातीवर बसलेली आहे. 

 

>> जर तुम्हाला वरील उल्लेख केलेल्यापैकी काही वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्लीप पॅरालिसिसची शिकार झालेला आहात. तथापि, हा आजार काही जीवघेणा नाही. परंतु असे वारंवार घडू लागल्यास गंभीर होऊ शकतो. यामुळे ग्रस्त व्यक्तीला इतर अनेक आजार घेरतात.


काय आहे स्लीप पॅरालिसिस?
>> स्लीप पॅरालिसिस एक अशी अवस्था आहे जेव्हा झोपेत मेंदू जागृतावस्थेत राहतो, परंतु शरीर निद्रेत असते. अशा वेळी तुम्ही हलण्याचा वा उठण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे वाटते की, जणू काही एखादी गोष्ट तुम्हाला असे करण्यापासून रोखत आहे. तुम्हाला वाटते की, छातीवर भूतच येऊन बसले आहे.

>> विशेषज्ञ याबाबत सांगतात की, स्लीप पॅरालिसिसमध्ये जेव्हा एखादा जागृतावस्थेत येतो तेव्हा त्याला आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवता येत नाही. यामुळे त्याला शरीराचा कोणताही अवयव हलवता येत नाही.


कुणाला होतो स्लीप पॅरालिसिस?
>> असे नेहमी अशा व्यक्तींसोबत जास्त होते जे निद्रानाशाने ग्रस्त आहेत. रात्री जागे राहण्याच्या आणि झोपण्याच्या अवस्थेदरम्यान होणाऱ्या क्रमाला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. तेव्हा शरीर मेंदूच्या आज्ञा स्वीकारत नाही आणि जड होऊन जाते.

 

मानवी मेंदूची किमया
>> वास्तविक, जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याचा मेंदू त्याच्या शरीराला आणि मनाला शक्तिहीन करतो, जेणेकरून त्याला आराम मिळावा. परंतु अशा वेळी कधी-कधी अशी स्थिती उद्भवते की, तुमचा मेंदू जागृत होतो, परंतु शरीर झोपलेले राहते. जेव्हा तुमचा मेंदू तुमच्या शरीराआधी उठतो तेव्हा स्लीप पॅरालिसिसची स्थिती निर्माण होते. पण बहुतांश जणांमध्ये ही स्थिती काही वेळात आपोआप ठीक होते.


लोकांच्या अंधश्रद्धा
>> स्लीप पॅरालिसिसने ग्रस्त बहुताशं जणांचा दावा असतो की, जाग येताच त्यांना असे वाटले की, त्यांच्या छातीवर एखादे भूत बसलेले आहे, ज्याचा चेहरा खूप भीतिदायक आहे. तो त्यांना जागेवरून उठू देत नाही. त्याने जखडून ठेवलेले आहे. परंतु वास्तवात असे मेंदू सुन्न झाल्याने होते, कारण भीतिदायक स्वप्नांची निर्मितीही याच काळात होत असते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या आजारावर काय आहे उपाय?

 

बातम्या आणखी आहेत...