आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Dialog Was Deleted After The Controversy, Karthik Said 'We Do Not Want To Hurt Anyone's Feelings ...'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादानंतर हटवला गेला डायलॉग, कार्तिक म्हणाला - 'आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत...'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट 'पती, पत्नी और वो'च्या मॅरिटल रेप डायलॉगवर वाढत्या वादावर अभिनेता कार्तिक आर्यनने प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेलरमधून डायलॉग हटवण्यावर कार्तिक म्हणाला की, आम्ही कुणाच्याही भावना दुःखवू इच्छित नाही. तो म्हणाला की, हा निर्णय आम्ही लोकांच्या भावनांचा सन्मान करून घेतला आहे. हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

काय होते प्रकरण... 


चित्रपटाचा ट्रेलर आउट होताच तो फॅन्सला खूप आवडला. मात्र कौतूकामध्ये कार्तिकच्या मॅरिटल रेपबद्दलच्या डायलॉगवर मोठा वाददेखील झाला. लोकांनी तो डायलॉग चित्रपटातून काढण्याचीही मागणी केली होती. विरोध करणाऱ्यांचे म्हणणे होते की, यामुळे गुन्हेगारीत वाढ होईल. चित्रपटात कार्तिकसोबत भूमी पेडनेकर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे.  


मात्र चित्रपटाच्या यूनिटने प्रकरण गंभीरतेने घेत वादग्रस्त डायलॉग मधील निवडक वाक्ये काढली आहेत. यावर प्रतिक्रिया देत सांगितले की, 'आम्ही प्रेक्षकांच्या भावनांचा सन्मान करत डायलॉग सुधारला आहे. तो म्हणाला की, आम्ही या गोष्टीची जबाबदारी घेतो की, आमच्या कामाने काही असे होईल याचा आम्हाला अंदाज नव्हता.' 


अभिनेत्याने सांगितले की, 'चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डायलॉग हायलाइट केला गेला होता. पण कुणालाच माहित नव्हते की, प्रेक्षक याचा असा अर्थ घेतील. तो म्हणाला की, हा चित्रपटाचा विषयही नाहीये. आम्हाला कुणाच्याही इमोशन्ससोबत खेळायचे नाहीये.'