आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Director Of 'Motichur Chaknachur Said' The Producer Ruined My Film, The Audience Should Not Watch It

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मोतीचूर चकनाचूर'ची दिग्दर्शिका म्हणाली- निर्मात्याने माझा चित्रपट बरबाद केला, प्रेक्षकांनी तो पाहू नये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अथिया शेट्टी अभिनीत 'मोतीचूर चकनाचूर'ची दिग्दर्शिका देवमित्रा बिस्वालचे म्हणणे आहे की, निर्माता राजेश भाटियाने कथेत बदल करून चित्रपट पूर्णपणे बरबाद केला आहे. खरे म्हणजे निर्मात्याने याच वर्षी मार्चमध्ये क्रिएटिव्ह डिफरन्सचा हवाला देत देवमित्रासह युनिटच्या अनेक सदस्यांना चित्रपटातून काढून टाकले होते. तसेच भाटिया सेटवर माझ्यासोबत अपशब्दांचा वापर करत होता, असा आरोपही देवमित्राने ऑक्टोबरमध्ये केला होता. तथापि, हा चित्रपट आता रिलीज झाला असून देवमित्रा त्यात दाखवण्यात आलेल्या कथेमुळे संतुष्ट दिसत नाही.

कोर्टाच्या सांगण्यावरून मला चित्रपट दाखवला गेला : देवमित्रा
देवमित्रा म्हणते, 'जेव्हा कोर्टाने भाटियाला नोटीस पाठवून हा चित्रपट दिग्दर्शकाला दाखवण्यास सांगितले होते, तेव्हाच मला तो दाखवण्यात आला. चित्रपट पाहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी यातील काही भाग कापून अनावश्यक दृश्ये जोडली आहेत. चित्रपटात काहीच शिल्लक राहिले नाही. हा सी-ग्रेड भोजपुरी चित्रपटांप्रमाणे वाटत आहे. मी या चित्रपटाचे माझ्याकडील व्हर्जन प्रेक्षकांना दाखवू शकले असते तर बरे झाले असते. फाइटनंतर त्यांनी चित्रपट संपादित करण्याचा निर्णय घेतला. भाटियाने स्वत:हून असे केले. कथादेखील पूर्णपणे बदलण्यात आली. ती कथा मी दिग्दर्शित केली होती. त्यांनी माझा चित्रपट आणि करिअर बरबाद केले आहे. त्यांनी मला दिग्दर्शक म्हणून क्रेडिट दिले. चित्रपट पाहिल्यानंतर मी त्यांना फोन करून क्रेडिट लिस्टमधून माझे नाव हटवण्यास सांगितले होते. कारण हा चित्रपट मी बनवलेला नाही. हा खूप भीतिदायक चित्रपट आहे. हा चित्रपट पाहू नका, अशी विनंती मी सोशल मीडियावरून लोकांना केली होती.'


देवमित्राच्या मते, व्हायाकॉम 18 ने भाटियांचा विरोध का केला नाही, यामागचे कारण तिला अजून समजलेले नाही. तथापि, त्यांचेही या व्हर्जनबाबत अनेक आक्षेप होते.