आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Dispute Between Farhan Akhtar And Hrithik Roshan Is Resolved, And Both Films Will Be Released On The Same Day

फरहान अख्तर आणि ऋतिक रोशन यांच्यातील वाद मिटला, एकाच दिवशी रिलीज होणार आहेत दोघांचे चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : योगायोग म्हणजे दोघेही पुन्हा एकदा २ ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार आहेत. या दिवशी एकीकडे ऋतिकचा 'वॉर' रिलीज होणार असून दुसरीकडे फरहानच्या बॅनरखाली बनलेला चित्रपट 'साई रा नरसिम्हा रेड्डी'देखील प्रदर्शित होणार आहे.

फरहान अख्तर व ऋतिक चांगले मित्र होते. दोघांनीही 'लक्ष्य', 'जिंदगी न मिलेगी दोबारा'मध्ये एकत्र कामदेखील केले आहे. तथापि, ऋतिकने आपला 'काबिल' फरहानच्या बॅनरखाली निर्मित 'रईस'सोबत रिलिज केला तेव्हा दोघांच्या मैत्रीमध्ये विघ्न आले. फरहानने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलावी, असे ऋतिक व त्याचे वडिल राकेश यांना वाटत होते, परंतु तसे झाले नाही.

'सूत्रांच्या मते, 'फरहान आणि ऋतिक बऱ्याच दिवसांपासून एकमेकांशी बोलले नाहीत. मात्र, नुकतेच फरहानने ऋतिकचे 'सुपर ३०'च्या यशाबद्दल अभिनंदन केले होते. आता त्याने ऋतिकचे नवीन गाणे 'जय जय शिव शंकर'चेदेखील कौतुक केले आहे. अशा वेळी दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे म्हणता येईल.

बातम्या आणखी आहेत...