• Home
  • Bollywood
  • News
  • 'The Donkey King' is the most watched Pakistani movie in the world, accused of making fun of PM Imran

सिनेमा / 'द डॉन्की किंग' बनला जगात सर्वात जास्त पाहण्यात आलेला पाकिस्तानी चित्रपट, चित्रपटावर इम्रान खान यांची खिल्ली उडवल्याचा आरोप

'द डॉन्की किंग' पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त 30 आठवडे चालणारा चित्रपट, जगातील 10 भाषांमध्ये डब झाला 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 03:49:08 PM IST

इस्लामाबाद- पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीवर बनलेला अॅनिमेशन कॉमेडी चित्रपट 'द डॉन्की किंग' जगात सर्वात जास्त पाहण्यात आलेला पाकिस्तानी चित्रपट बनला आहे. हा चित्रपट जगातील 10 भाषांमध्ये डब झाला आहे. हा दक्षिण कोरियामध्ये प्रदर्शित झालेला पहिला पाकिस्तानी चित्रपट आहे. याशिवाय तुर्की, रशिया, स्पेनसहित 7 देशांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे. तावीज स्टूडिओ आणि जिओ फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज जिंदानी यांनी केले आहे. चित्रपटात राजकीय व्यंग दाखवण्यात आले आहे. यात 'मंगू' नावाचा गाढव नशीबाने राजा बनल्याची गोष्ट आहे


लोक या गोष्टीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी जोडत आहेत. इम्रान आणि या चित्रपटातील अनेक व्हिडिओ जोडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. यामुळेच चित्रपटावर इम्रान खान यांच्यावर विनोद केल्याचा आरोपही लावण्यात आला. पण, दिग्दर्शक अजीज यांनी आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, या चित्रपटाचा विचार 2003 मध्ये केला होता आणि यावर 2013 मध्ये काम करणे सुरू केले.


चित्रपटाला राजकीय वादांचा फायदा झाला

ऑक्टोबर 2018 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट पाकिस्तानात खूप हीट झाला. यानंतर चित्रपट जगभरात रिजील झाला आणि तिथेही खूप मोठा हीट ठरला. चित्रपटाला रिलीज होण्यापूर्वी अनेक कायदेशीर कारवायांचा सामना करावा लागला. यावर लागलेल्या सर्व आरोपांना इस्लामाबाद हायकोर्टने रद्द केले. पण, या सर्वातून चित्रपटाला खूप फायदा झाला.


चित्रपटाने बनवले अनेक रेकॉर्ड
'द डॉन्की किंग'ने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. पाकिस्तानात ओपनिंग डेवर सर्वात जास्त 36 लाख रुपये कमवणारा पहिला अॅनिमेटेड चित्रपट आहे. चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी 1 कोटी रुपये कमवले होते. आतापर्यंत चित्रपटाने 50 कोटींपेक्षा जास्तीचा व्यवसाय केला आहे.

X