आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गावांत महिलांनी सत्ता सांभाळताच मुलींना खुली झाली महाविद्यालयीन शिक्षणाची दारे!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर : लोकशाहीत लोकांच्या सहभागाच्या सकारात्मक बदलाचे एक उदाहरण सागर जिल्ह्यातील मालथॉन विभागातील हडली ग्रामपंचायतीत बघता येते. येथे २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ग्रामस्थांनी पुढाकार घेत सर्व १२ सदस्य, सरपंचपदाची जबाबदारी महिलांना सोपवली. २०१६ मध्ये प्रजासत्ताकदिनी महिलांनी बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेला चालना देण्याचा मोठा निर्णय घेतला. मुलींसंदर्भात तीन विभागांत पुरस्कार देण्याचे ठरवण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम बघावयास मिळत आहे. पंचायतीतील ३ गावे बोबई आणि मडावनमारपैकी दोघांमध्ये जेथे एकही मुलगी दहावीच्या पुढे शिकली नव्हती तेथे आता उच्च माध्यमिकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ९ झाली आहे, तर ५ जणी महाविद्यालयात शिकत आहेत. एवढेच नव्हे तर गावकऱ्यांनी सुनांना शिकवण्यासाठीही पुढाकार घेतला. बोबई गावातील २ सुना पदवीधर झाल्या आहेत. ८ वर्षांपूर्वी एकच मुलगी हायस्कूलमध्ये जायची आता १३. ग्रामपंचायत हडलीमध्ये ३ गावे आहेत. यात हडली, मडावनमार आणि बोबई यांचा समावेश आहे. केवळ हडली गावातील एकमेव मुलगी रमा लोधी हायस्कूलच्या शिक्षणासाठी गावापासून २० किलोमीटर अंतरावरील बांदरीला जायची. नंतर तिने बीफार्माचे शिक्षण पूर्ण केले. २०१६ नंतर आलेल्या सकारात्मक बदलांचा परिणाम असा झाला की, हडलीतील ५ मुली हायस्कूलमध्ये शिकताहेत तर ८ जणींनी उच्च माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर पाच विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मालथौन-बांदरीला जातात. याप्रकारे पंचायतीतील १४ विद्यार्थिनी उच्च माध्यमिकमध्ये शिकताहेत. उर्वरित १० विद्यार्थिनी महाविद्यालयात शिकत आहेत.

सरपंच लीलाबाई अहिरवार यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीतील तीन गावांमध्ये आठवीपर्यंत शाळा आहे. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी ३ ते ६ किलो मीटर लांब सागौनी, रजवांस जावे लागते. महाविद्यालय तर २५ किमी लांब मालथौन येथे आहे. पदवी तर दूरच. उच्च माध्यमिकमध्येही कोणतीच मुलगी शिकत नव्हती. मुली आणि त्यांच्या पालकांना प्रोत्साहन देत आम्ही त्याला चालना दिली. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी बोबई गावातील कार्यक्रमात सर्वांचा सन्मान केला जातो. २०१० ते २०१५ दरम्यान येथे १०० मुलांमागे ८७ मुलींचा जन्मदर होता. गेल्या पाच वर्षात हे प्रमाण १०० मुलांमागे ९० मुली झाले आहे.

पुरस्कार देऊन केला जातो सन्मान

नववी आणि त्यापुढे शिकणाऱ्या मुलींचा सन्मान लक्ष्मी पुरस्काराने केला जातो. मुलींना शिकण्यासाठी गावाबाहेर पाठवणाऱ्या पालकांचा सन्मान पंचायत गौरवने केला जातो. तर केवळ मुली असलेल्या पालकांचा जनक पुरस्काराने सन्मान केला जातो.