आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The 'drama' Of The Karnataka Drama On July 18, BJP Issued A Notice For The Non confidence Motion

कर्नाटक नाट्याचा १८ जुलैला ‘विश्वास’ अंक, भाजपने अविश्वास प्रस्तावासाठी नोटीस दिली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी १८ जुलैला विश्वासदर्शक प्रस्ताव सादर करणार आहेत. विधानसभा सभापती रमेशकुमार यांनी यासाठी गुरुवारचा दिवस निश्चित केला आहे. चर्चेनंतर या प्रस्तावावर त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी मतदान होईल. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी सोमवारी ही माहिती दिली. दरम्यान, भाजपनेही राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. भाजप, काँग्रेस आणि जेडीएसने आपापल्या आमदारांची व्यवस्था बंगळुरू परिसरात असलेल्या रिसॉर्टमध्ये केली आहे. 


काँग्रेसच्या १३ आणि जेडीएसच्या ३ बंडखोर आमदारांना आपले राजीनामे देण्याची घोषणा केल्यानंतर हे युतीचे सरकार संकटात आहे. मात्र, सभापतींनी या आमदारांचे राजीनामे मंजूर केलेले नाहीत. बंडखोर आमदार मुंबईत आहेत. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर काँग्रेस नेत्यांना भेटण्याची इच्छा नसल्याचे पत्र या बंडखोर आमदारांनी पोलिसांना दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बंडखोर आमदार विश्वासदर्शक प्रस्तावावरील चर्चेत सहभागी नसतील. 


बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी : काँग्रेसच्या पाच बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. 

 

भाजपचे पारडे जड 
हे १६ बंडखोर आमदार गैरहजर राहिले किंवा त्यांचा राजीनामा मंजूर झाला किंवा त्यांना अपात्र ठरवले तर सभागृहातील सदस्यांची संख्या घटून २०८ होईल आणि बहुमताचा आकडा १०४ होईल. भाजपकडे दोन अपक्षांसह १०७ आमदारांसह स्पष्ट बहुमत होईल, तर काँग्रेस - जेडीएसकडे १०० आमदार राहतील.