आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव टेम्पो झाडावर आदळून चालक जागीच ठार, चार गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - येलदरी ते जिंतूर रस्त्यावर शेवडी शिवारात भरधाव टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे ताे झाडावर जाऊन धडकला. त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. सोमवारी(दि.२०) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. 


येलदरीहून  लाकडाने भरलेला टेम्पो (एम.एच.०४-सीजी-०५२८) सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जिंतूरकडे येत होता. शेवडी शिवारात उतारावर चालकाने टेम्पो वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्याचा गाडीवरील ताबा सुटला व टेम्पो झाडावर धडकला. या अपघातात टेम्पो चालक मोहंमद अफरोज (वय २५, रा.जिंतूर) हा जागीच ठार झाला. टेम्पोतील अन्य चौघे जण केबिनमध्ये अडकून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. टेम्पोची केबिन तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. मेहताब खान(वय ६५, मोहंमद रियाज मोहम्मद मुमताज(वय ३५), शेख सलमान व शेख शोएब हे चाैघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोनाजी आमले व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.