Crime / श्रद्धांजलीसाठी मद्यधुंद तरुणाने केला गोळीबार, वृद्धाचा जागीच मृत्यू

पिस्तुलाचे लॉक काढताना घडली घटना 

दिव्य मराठी

May 12,2019 09:09:00 AM IST

जळगाव - आजोबाच्या अंत्यसंस्कारावेळी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने मद्यधुंद नातवाने पिस्तुलाने हवेत दोन फैरी झाडल्या. तिसरी गाेळी झाडताना पिस्तूल लॉक झाले. ते दुरुस्त करताना गोळी सुटली व एका वृद्धाच्या छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पिंप्री येथे ही घटना घडली.


तुकाराम वना बडगुजर (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल बडगुजर यांचे वडील श्रावण बारकू बडगुजर (८७) यांचे शनिवारी निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्निडागानंतर मृत बडगुजर यांचा नातू दीपेश (२८) याने श्रद्धांजलीसाठी स्वत: जवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार सुरू केला. दोन फैरी हवेत झाडल्यानंतर पिस्तूल लॉक झाले. लाॅक काढताना अचानक तिसरी गोळी सुटली. ही गोळी शेजारी उभ्या तुकाराम बडगुजर यांच्या छातीत घुसली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

X