आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: दारुड्या मुलाने आईचा वस्तऱ्याने गळा कापून केला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - लोहा तालुक्यातील हिप्परगा (चितळी) येथे पांडुरंग यादव कोंडामंगले या दारूच्या आहारी गेेलेल्या मुलाने आईचा वस्तऱ्याने गळा कापून खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला घडली. या प्रकरणी माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  


हिप्परगा येथे पांडुरंगचे हेअर कटिंग सलूनचे दुकान आहे. पांडुरंग दारूच्या आहारी गेला असून तो दररोज दारू पित असे. त्यावरून त्याचे व त्याची आई शांताबाई यादव कोंडामंगले (७०) यांच्यात वाद होत असत. पांडुरंगची पत्नी माहेरी गेली असल्याने सध्या तो आणि आई हेच घरी होते. त्यामुळे शांताबाई त्याला दारू पिऊन आल्यानंतर टोकत असे. काम धंदा कर, दुकान चांगले चालव, रोज दारू कशाला पितो असे म्हणत असल्याने त्याला शांताबाईचा राग आला. त्याने घरातील वस्तरा घेऊन शांताबाईच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात असताना रस्त्यातच ती मरण पावली. या प्रकरणी अधिक पोलिस तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...