आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Effects Of Global Economic Slowdown More Pronounced In India And Brazil, Says IMF Chief

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात अधिक ठळकपणे दिसून येत आहेत 'जागतिक मंदी'चे परिणाम; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नवनियुक्त एमडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - जागतिक स्तरावर अनेक देशांना समकालिक मंदीचा फटका बसला आहे. परंतु, भारतात या मंदीचे परिणाम अधिक ठळकपणे दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक (एमडी) ख्रिस्टालीना जॉर्जीव्हा यांनी हे विधान केले आहे. जॉर्जीव्हा यांच्या मते, सर्वत्र मंदीचा परिणाम दिसून येत आहे. अर्थातच 2019-20 चा आर्थिक विकास दर सर्वात निच स्तरावर राहील. केवळ भारतातच नव्हे, तर 90 टक्के जगाला या घटत्या विकासदराचा सामना करावा लागेल.

ख्रिस्टालीना जॉर्जीव्हा यांनी मंगळवारी आयएमएफच्या एमडी पदाची सूत्रे हाती घेतली. त्याचवेळी पहिल्या भाषणात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, "दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये विकास पाहायला मिळाला होता. जगाचा 75 टक्के भाग विकसाच्या दिशेने वाटचाल करत होता. आता जागतिक अर्थव्यवस्थेवर समकालिक मंदीचे सावट आहे. जगभरातील 90 टक्के देशांमध्ये विकासदर कमी झाल्याचे दिसून येणार आहे." त्याचाच एक भाग म्हणून जर्मनीत बेरोजगारीने निचांकी आकडा गाठला आहे. अमेरिका, जपान आणि प्रामुख्याने युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंद स्थिती पाहायला मिळाली आहे. परंतु, भारत आणि ब्राझील या सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये यावर्षी मंदीचा परिणाम अधिक ठळकपणे दिसून येत आहे असेही जॉर्जीव्हा यांनी नमूद केले.