आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात जुन्या मैदानावर पाचवी फायनल ; आठ स्टेडियम १०० वर्षांपेक्षा अधिक जुने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंग्लंड आणि वेल्स हे क्रिकेटच्या विश्वातील सर्वात माेठ्या स्पर्धेच्या यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या ३० मेपासून आयसीसीच्या विश्वचषकाला सुरुवात हाेत आहे. या ४५ दिवस रंगणाऱ्या या विश्वचषकात ४८ सामने हाेणार आहेत. यासाठी इंग्लंडमधील १० शहरांतील ११ स्टेडियम सज्ज झालेले आहेत. यातील आठ स्टेडियमला १०० वर्षांचा माेठा वारसा लाभला आहे. यामध्ये काही मैदाने ही १०० पेक्षा अधिक वर्षांंपूर्वी  तयार झालेले आहेत, तर काही नव्याने तयार करण्यात आले. राेज बाऊलच्या मैदानावरच प्रथमच सामने हाेतील. 

 

लॉर्ड्स (लंडन) : 1814 मध्ये स्थापना

> क्षमता : 28 हजार

 

> फायनलसह ५ सामने हाेतील.


> जगातील सर्वात जुने  क्रिकेट स्टेडियम आहे. १८८४ मध्ये पहिला कसाेटी सामना झाला.  स्टेडियमचे निर्माते  थॉमस लॉर्ड यांच्या नावावरून नामकरण. थॉमस १५ वर्षे क्रिकेट खेळले. 


> हे मैदान वर्ल्डकप इतिहासात पाचव्यांदा फायनलचे यजमान भूषवणार आहे.

 
> येथे जगातील सर्वात जुने  स्पोर्ट््स म्युझियम (एमसीसी म्युझियम) आहे.  क्रिकेटच्या अनेक ऐतिहासिक वस्तूंसह येथे अॅशेसची राखही आहे.    


> २००५ पर्यंत आयसीसीचे हेडक्वार्टर येथेच हाेते.

 
> लंडनचा इतिहास २००० इ.स. पूर्वीचा आहे. पहिल्या शतकात राेमनचे अधिराज्य हाेते.

 
> येथे ३०० पेक्षा अधिक भाषा बाेलणारे नागरिक राहतात.


> भारताने येथे ८ पैकी ४ सामने जिंकले, ३ पराभव, १ टाय.

 

इतर स्टेडियम विषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..............

बातम्या आणखी आहेत...