आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वेळा विजयी काँग्रेसचे थोरात होऊ शकतात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राज्यात चौदावी विधानसभा १० नाेव्हेंबरच्या अात अस्तित्वात येणार अाहे. त्यात २८८ अामदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचा मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आठ वेळचे अामदार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता अाहे.


नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्षपदी सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या निवडीची प्रथा अाहे. ज्येष्ठ अामदारांच्या नावांची यादी विधिमंडळ सचिवालय राज्यपालांना सादर करते व त्यानंतर ते हंगामी अध्यक्षांच्या नावाची निवड करतात. १४ व्या विधानसभेतील १० ज्येष्ठ सदस्यांची यादी सचिवालयाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. त्यामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ म्हणून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील सात वेळा, राष्ट्रवादीचे अजित पवार व भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपचे कालिदास कोळंबकर, काँग्रेसचे के. सी. पाडवी हेही सातव्यांदा विधानसभेत आले आहेत. भाजपचे अामदार व माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या वेळी सहावी टर्म आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहाव्यांदा विधानसभेत येत आहेत.



२०१४ मध्ये जिवा पांडू गावित यांना मिळाला होता मान
हंगामी अध्यक्ष राज्यपाल नियुक्त करत असतात. सर्व सदस्यांना शपथ आणि अध्यक्षांची निवड प्रक्रिया हे काम हंगामी अध्यक्ष यांचे असते.


२०१४ मध्ये शेकापचे गणपतराव देशमुख हे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. मात्र त्यांनी नकार दिल्याने माकपचे जिवा पांडू गावित यांना मान दिला.
 

बातम्या आणखी आहेत...