आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्यांनी तयार केली इलेक्ट्रिकल कार, एकदा चार्जिंग केल्यानंतर धावते तब्बल 180 किमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : सध्या पेट्रोलच्या भावात सतत चढउतार सुरू असतात. पण, ते कमी होण्याची चिन्हे नाहीत. अनेक जण दुचाकीत तर २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यत पेट्रोल भरतात. कारमध्ये मात्र असे करता येत नाही. यामुळे अभिजित खडाखडी आणि शुभम कनेरे या दोन तरुणांनी पेट्रोल कारमधील पेट्रोल इंजिन बदलून तिथे इलेक्ट्रिक इंजिन लावले. त्यामुळे आता पेट्रोल कार इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरीत करणे सोपे झाले आहे. आपण पेटंटसाठी अर्ज केल्याची माहिती अभिजितने दिली. हे दोघेही अभियंते आहेत.

एक तर स्वत: नामांकीत मोटार उत्पादक कंपन्यांसोबत उत्पादन घेण्याचे प्रयत्न आहेत. स्टार्ट अप इंडिया योजनेतंर्गत कर्ज काढून स्वत:चे यूनिट टाकण्याचा प्रयत्न असल्याचे अभिजितने सांगितले.

या कारमध्ये मॅन्युअल गिअर सिस्टिम दिलेली आहे. ही गाडी एक हजार किलोपर्यंत लोड सहन करू शकते. या गाडी मध्ये १०० अॅप आणि १२ व्होल्ट अशा ४ बॅटरी लावलेल्या आहेत. ही गाडी एका चार्जिंगवर १८० किमी चालते. इलेक्ट्रिक इंजिन ३ हजार वॅटचे असल्याने लोड कॅपॅसिटी जास्त आहे.

बँकेकडून घेतले कर्ज

दोघांनी ही गाडी त्यांचा बिल्डर मित्र अमोल पाटील यांच्या जागेत तयार केली. यासाठी पंजाब नॅशनल बँकेने अर्थसहाय केले. गाडी सध्या पेट्रोल गाडीसारखीच चालते. आणि या गाडीला पिकउप पेट्रोल इंजिन सारखाच आहे. मॅन्यूअल गिअर सिस्टिम असल्या कारणाने गाडी चढाव व वजन सहन करू शकते.

 

बातम्या आणखी आहेत...