आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार उलटून १०६ वर्षांच्या वृद्धेसह अकरा महिन्यांची चिमुकली ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती -  नागपूरहून अमरावतीकडे येणारी कार अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात ३० फुटांवर जाऊन उलटली. या अपघातात कारमधील १०६ वर्षीय वृद्ध महिला तसेच ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर कारमधील इतर चौघे जखमी झाले. हा अपघात नागपूर महामार्गावर कारंजा घाडगेजवळ शनिवारी रात्री घडला. 

मनाबाई अजाबराव दांडगे (१०६, रा. नागपूर) आणि नभा विशाल इंगळे (११ महिने, रा. नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाल्यानंतर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी तपासणीअंती मनाबाई व चिमुकली नभा यांना मृत घोषित केले. विशाल इंगळे व त्यांचे नातेवाईक कारने नागपूरहून अमरावतीकडे येत होते. कारंजाजवळ  त्यांची कार अनियंंत्रित झाली आणि रस्त्यालगत असलेल्या शेतात सुमारे २५ ते ३० फूट अंतरावर जाऊन उलटली. यात मनाबाई व नभा यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.