आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलनिस्सारण याेजनेचा निर्णय उच्चाधिकार समिती घेणार; 100 काेटींतून रस्ते डांबरीकरणाचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावअमृत अभियानांतर्गत मलनिस्सारण याेजनेच्या कामासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान व निविदा संदर्भातील धाेरणात्मक निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती घेणार अाहे. याशिवाय नगराेत्थान याेजनेंतर्गत मंजूर १०० काेटीतून रस्त्यांचे काँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरणाच्या प्रस्तावाची माहिती मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येणार अाहे. पाणीपुरवठा याेजनेच्या कामाला गती देऊन वर्षभरात काम पूर्ण करण्याच्या सुचना नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी जळगाव महापालिका अायुक्तांना दिल्या.

 

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या अमृत अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा याेजना, अंमलबजावणी न झालेल्या मलनिस्सारण याेजना तसेच हरित क्षेत्राच्या कामांचा अाढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मंत्रालयात बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या बैठकीला महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासह शहर अभियंता

डी. एस. खडके, सहायक अभियंता सुनील भाेळे, प्रकल्प विभागाचे अभियंता याेगेश बाेराेले मुंबईला  रवाना झाले हाेते.

 

अधिवेशनामुळे बैठक दाेन तास लांबली. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सुरू झालेली बैठक अवघ्या १५ ते २० मिनिटात अाटाेपली. यावेळी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे अामदार सुरेश भाेळे व अायुक्त चंद्रकांत डांगे, सहायक सचिव जाधव यांची उपस्थिती हाेती. या बैठकीत घनकचरा प्रकल्पाचा अाढावा घेतला.

 

महिनाभरात निर्णय शक्य : जळगाव दाैऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलनिस्सारण याेजनेच्या अमंबलजावणीसाठी दाेन स्वतंत्र निविदा प्रसिध्द करण्याची सुचना केली हाेती. मुख्यमंत्र्यांच्या अादेशानंतर पालिकेने तातडीने नगरविकास विभागाला अाॅक्टाेबर महिन्यात मार्गदर्शन मागवले हाेते. परंतु, शासनाने काहीही कळवले नव्हते. दरम्यान, मंत्रालयात अायाेजित बैठकीत मलनिस्सारण याेजनेंतर्गत भुयारी गटारींसाठी पाईप टाकणे तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारणे तसेच काेणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा याचा धाेरणात्मक निर्णय घेणे गरजेचे अाहे. या संदर्भात निर्णय अाता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीमार्फत घेण्यात येणार असल्याचे प्रधान सचिवांनी बैठकीत स्पष्ट केले.


अमृतच्या कामाला गती द्या : अमृत याेजनेंतर्गत शहरात नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले अाहे. काॅलनी व उपनगरांत कामाला गती देण्यात अाली अाहे. अातापर्यंत ४६ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती अायुक्त डांगे यांनी प्रधान सचिव म्हैसकर यांना दिली. नाेव्हेंबर २०१९पर्यंत काम पूर्ण करायचे असल्याने कामाला अाणखी गती देण्याची सूचना करत अातापर्यंत झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच हरित क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या कामांचाही अाढावा घेतला. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांबाबत चर्चा करण्यात अाली. यात एमपीएससी परिक्षेचा निकालाला स्थगिती अाहे. नवीन बॅचमधून प्राधान्याने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगण्यात अाले.

 
भुयारी गटारींसाठी रस्त्यांचे खाेदकाम हाेणार असल्याने कांॅक्रिटीकरण टाळणे शक्य
मुख्यमंत्र्यांनी जळगाव दाैऱ्यात नगराेत्थान याेजनेंतर्गत १०० काेटीतून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली हाेती. प्रमुख रस्ते हे कांॅक्रीटचे करायचे असेही स्पष्ट केले हाेते. परंतु, शहरात अद्याप अमृत अंतर्गत भुयारी गटारींचे काम सुरू झालेले नाही. भविष्यात पुन्हा रस्त्यांचे खाेदकाम करावे लागणार अाहे. त्यामुळे काॅक्रीटएेवजी डांबरी रस्त्यांचा पर्याय याेग्य असेल, असे मत प्रधान सचिवांसाेबत चर्चेदरम्यान अायुक्तांनी व्यक्त केले. यासंदर्भात विषय मुख्यमंत्र्यापर्यंत पाेहचविण्यात येईल असे बैठकीत सांगण्यात अाले

बातम्या आणखी आहेत...