आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरुडासनामुळे कमी होतो सायटिका अन् संधिवाताचा त्रास

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कसे करावे : सुरुवातीला ताडासानात उभे राहावे. गुडघ्यात वाकून डावा पाय उचलून उजव्या पायाला विळखा घाला. त्यानंतर उजवा पाय जमिनीवर स्थिर ठेवा आणि डावी मांडी उजव्या मांडीवर ठेवा. डाव्या पायाच्या पंजाचे टोक जमिनीकडे असावे. दोन्ही हात जमिनीला समांतर असतील असे वर घ्या. उजव्या हाताने डाव्या हाताला विळखा घाला आणि कोपरात घडी घालून हात जमिनीला काटकोनात स्थिर करा. हात हळुवार असे फिरवा की तळहात एकमेकांसमोर येतील. तळहात चिकटून ठेऊन बोटे वरच्या दिशेला ताणा. एका जागेवर नजर स्थिर करून दीर्घ श्वान घेत आसनात स्थिर राहा.

गरुडासनाचे लाभ : खांदे, वरची पाठ, कंबर आणि मांड्या यांच्यामध्ये ताण निर्माण होतो. शरीराचा तोल सुधारतो. पिंढऱ्या मजबूत बनतात. सायटिका आणि संधिवात कमी होण्यास मदत होते. पाय आणि मांड्या सैल होतात, लवचिक बनतात. 

कोणी करू नये : अलीकडे गुडघे, घोटे तसेच कोपरांची शस्त्रक्रिया झाली असल्यास हे आसन करू नये.