• Home
  • National
  • The evidence presented by the advocate to the Supreme Court, along with the CCTV footage

सरन्यायाधीश रंजन गोगोईंवरील आरोपप्रकरणी सुनावणी : वकिलाने सीसीटीव्ही फुटेजसह सुप्रीम कोर्टात सादर केले पुरावे

दिव्य मराठी

Apr 25,2019 09:52:00 AM IST

नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगोईंवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपप्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हा आरोप म्हणजे षड‌्यंत्र असल्याचा दावा करणारे अॅड. उत्सव बैस यांनी काही पुरावे सादर केले. यात काही सीसीटीव्ही फुटेज आहे. हा एक काॅर्पोरेट कट असल्याचा बैस यांचा दावा आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात काही फिक्सिंग चालू असेल तर त्याच्या मुळापर्यंत जाऊ, असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले.


या षड‌्यंत्रामागे नेमके कोण आहे हे कोर्टाला जाणून घ्यायचे आहे, असे न्या. मिश्रा म्हणाले. अॅड. बैस यांनी हे षड‌्यंत्र असल्याचा दावा शपथपत्राद्वारे केला आहे. शिवाय यात हात असलेल्या व्यक्ती आपल्याला भेटल्या होत्या, असेही अॅड. बैस यांचे म्हणणे आहे.

आयबी, सीबीआय, दिल्ली पोलिसांना पाचारण :

दरम्यान, न्या. अरुण मिश्रा यांनी या प्रकरणी आयबी प्रमुख, दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि सीबीआय संचालकांना पाचारण केले असून त्यांनी चेंबरमध्ये आपली भेट घ्यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार तिघे हजर झाले आणि न्यायमूर्तींच्या कक्षात ही चर्चा झाली.

दुपारी १२.३० वा. :

सीबीआयचे संयुक्त संचालक, आयबीचे संचालक आणि दिल्ली पोलिस आयुक्त या तिघांनी न्यायमूर्तींची बंद खोलीत भेट घेतली. चर्चा कळू शकली नाही.

दुपारनंतर ३.०५ वा. :

त्सव बैस यांनी सीलबंद लिफाफ्यात आणखी काही कागदपत्रे सादर केली. या कटातील लोक भेटल्याचे त्यांनी सांगितले. यावर सुनावणी सुरू झाली.

वकिलास संरक्षण
आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करणारे अॅड. बैस यांना पुरेसे संरक्षण द्यावे, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

X