आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके कापणाऱ्या मशीनमध्ये अडकला पाय, शेतकऱ्याने स्वत:च्या हातानेच तोडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंकन - अमेरिकेतील नेब्रास्कामध्ये ६३ वर्षीय शेतकरी कुर्ट केझर यांचा पाय पिके कापण्याच्या मशीनमध्ये अडकला होता. जीव वाचवण्यासाठी त्याने चाकूच्या साह्याने स्वत:चा पाय कापला. केझर यांनी सांगितले, ते शेतातील मका पीक एका ठिकाणाहून दुसरीकडे नेत होते. तेव्हा ट्रकमधून खाली उतरले तेवढ्यात त्यांचा पाय मशीनमध्ये अडकला. मशीन पाय ओढून घेत होती. त्यांना सुरुवातीला पायच कापला जाईल, असे वाटले. परंतु मशीनमध्ये ते स्वत:च ओढले जात होते. कारण मशीन पाय खेचून त्यांनाही आत ओढत होती.  हे पाहून त्यांना धक्काच बसला. अशा वेळी जिवावरच बेतले होते. तेवढ्यात त्यांनी प्रसंगावधान राखून खिशातून चाकू काढला आणि गुडघ्याखालचा भाग कापून टाकला. पाय कापल्यानंतर ते रांगतच आपल्या घरी पोहोचले. घरी त्यांचा मुलगा अॅडम होता. त्याने त्यांना रुग्णालयात नेले. घटनेसंदर्भात केझर सांगतात, अशा परिस्थितीत तू इतका शांंत कसा? असा प्रश्न प्रत्येक जण विचारतो आहे. तेव्हा मी विचार करतो की, जगात अनेक लोकांना पाय नाहीत, असे अनेक जण आहेत. मग मी तर काही दिवसांनी बरासुद्धा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...