आंद्र प्रदेश / शेतात काम करत असताना शेतकऱ्याला सापडला 60 लाखांचा हिरा, 5 तोळे सोने आणि 13.5 लाखांत केली विक्री

विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवराय आणि त्यांचे मंत्र्यांनी येथील जमिनीत खजिना लपवला असल्याची लोकांनी धारणा 
 

दिव्य मराठी

Jul 21,2019 07:26:00 PM IST

हैदराबाद - आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील गोलावनेपल्ली गावातील एक शेतकऱ्याला शेतात 60 लाख रुपये किमतीचा हिरा सापडला. गरीब शेतकऱ्याने एक स्थानिक व्यापारी अल्लाह बख्सला हिरा विकला. व्यापाऱ्याने हिऱ्याच्या मोबदल्यात 5 तोळे सोने आणि 13.5 लाख रुपये रोख दिली. संबधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, हिऱ्याचे कॅरेट, रंग आणि वजनाबाबत माहिती घेण्यात आहे. एखाद्या व्यक्तीला हिरा सापडण्याची कुरनूल जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 12 जून रोजी एका मेंढपाळाला 8 कॅरेटचा हिरा सापडला होता. तो हिरा 20 लाख रुपयांत विकला गेला होता.


पावसाळ्यात वाढतो हिऱ्यांचा शोध
कुरनूल जिल्हा हिऱ्याच्या उत्पादनाबाबत चर्चेत आहे. येथील जोनागिरी, तुग्गाली, मडि्डकेरा, पगिडिराई, पेरावली, महानंदी आणि महादेवपुरम यांसारख्या गावात पावसाळ्यात ग्रामस्थ हिऱ्यांचा शोधात असतात.

हिऱ्याच्या शोधासाठी कुरनूलच्या आसपासच्या गावातील आणि जिल्ह्यातील लोक याठिकाणी येत असतात. यांमध्ये प्रामुख्याने कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील लोकांचा समावेश असतो. पावसामुळे माती वाहुन जाते आणि यामुळे हिरे पृष्ठभागावर येऊन चमकतात. यामुळे त्यांना शोधणे सोपे होते.


यामुळे येथे सापडतात हिरे
हिरे सापडत असलेले क्षेत्र सर्वनारासिम्हा स्वामी मंदिराजवळ आहे. विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवराय आणि त्यांचे मंत्री तिमारासु यांनी जमिनीखाली खजिना लपवला होता. यामुळे येथे हिरे सापडत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

X