आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादच्या शेतकरी कुटुंबाला शिवराज्याभिषेकाचा मान; रायगडावर हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने शिवरायांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा साजरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी हजारो शिवप्रेमींनी ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली. छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत उस्मानाबादच्या मेडसिंग येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी लक्ष्मण अवचार यांच्या पत्नी रेश्मा, आई चिवाबाई व वडील गणपती अवचार या कुटुंबाला मिळाला. या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वीकारली आहे.