आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर शेतकऱ्यांच्या संतापात सत्तेचे आसन भस्मसात होईल, मुख्यमंत्री कोण यापेक्षा शेतकरी महत्त्वाचे : उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - मुख्यमंत्री कोणाचा होईल हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे त्यांनी अगोदर शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाच्या आगीत सत्तेचे आसन भस्मसात होईल. भाजपबरोबर युती केली त्या वेळी “शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी’ असे वचन घेतले होते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित शेतकरी विमा 
मदत केंद्र व शेतकरी मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 


ठाकरे म्हणाले, प्रधानमंत्री फसल विमा योजनेत काहीतरी घोटाळा आहे, असे मी सांगत होतो. तथापि, मी सरकारविरोधात टीका करतोय असा अनेकांचा गैरसमज होत होता. आता त्याची प्रचीती येत आहे. कारण हजारो शेतकऱ्यांना विमा हप्ते भरूनही भरपाई मिळालेली नाही. विमा कंपन्यांच्या अनेक दलालांनी शेतकऱ्यांचे हप्ते हडप केले. 

 

सारे काही शेतकऱ्यांसाठी
मुख्यमंत्री कोणाचा होणार याचे मला घेणे-देणे नाही. मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला बांधील आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवू शकत नसेल तर तो राज्यकर्ता फोल ठरतो. राम मंदिराबाबत उद्धव म्हणाले, देशात आता रामराज्य आहे हे दाखवण्यासाठी शिवरायांचा मावळा म्हणून भगवा ध्वज हातात घेऊन राममंदिर उभारणारच.