आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - नार्वेचे लाँजेयर शहर आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उत्तरेकडील शेवटचे शहर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या फक्त 2000 च्या घरात आहे. स्वाबलार्ड बेटावरील हे एकमेव शहर आहे, जेथे रक्त गोठवणारी थंडी असतानाही लोक राहतात. केवळ थंडीच नाही, तर पोलार बेअरच्या हल्ल्यापासूनही लोकांना जिवाची भिती आहे. तरीही या शहराचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, येथे कुणालाही मरण्याची परवानगी नाही.
खाणकामासाठी वसले होते शहर...
> अमेरिकन नागरिक जॉन लाँजेअरने या शहराचा शोध लावला. त्यामुळे, या शहराचे नाव लाँजेयर असे पडले आहे.
> 1906 मध्ये त्यांनी आर्कटिक कोल कंपनी सुरू केली होती. तसेच खाणकामासाठी 500 जणांचा एक समूह देखील आणला.
> त्यांच्याच कंपनीने हे शहर वसवले होते. 1990 पर्यंत येथील सर्वच मायनिंग प्रोजेक्ट स्वियाग्रूव्हा (Sveagruva) या शहरात स्थलांतरित झाले.
> आता हे शहर मोठे टूरिस्ट हब बनले आहे. तसेच मोठ्या संख्येने लॅब आणि रिसर्चचे काम सुरू आहे.
> या शहरात 4 महिने सूर्य उगत नाही. त्यामुळे 4 ही महिने 24 तास केवळ रात्र असते.
> यासोबत कुठल्याही रस्त्याला काहीच नाव किंवा नंबर दिलेला नाही. स्नो स्कूटर येथे एकमेव वाहन आहे.
मरण्याची परवानगी नाही
या शहरात एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल किंवा त्याचा मृत्यू जवळ असल्याचा भास झाला असेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाते. इतरत्र हलवण्यासाठी तातडीने विमान, हेलिकॉप्टर किंवा जहाजाची व्यवस्था केली जाते. कारण, या शहरात केवळ एकच कब्रस्तान असून ते खूपच छोटे आहे. गेल्या 70 वर्षांपासून तेथे कुणालाच दफन करण्यात आले नाही. 70 वर्षांपूर्वी दफन करण्यात आलेल्या मृतदेहांची थोडीफारही झीज झालेली नाही. रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळे त्या तशाच अवस्थेत आहेत. संशोधकांनी काही वर्षांपूर्वी येथे पुरलेल्या मृतदेहाचे सॅम्पल घेतले होते. ते मृतदेह कित्येक वर्षांपूर्वी एन्फ्लुएंझा व्हायरसने मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीचे होते. एवढी वर्षे होऊनही त्याच्या शरीरातील व्हायरस नष्ट झाले नव्हते. त्यामुळेच, येथील सरकारने नो डेथ पॉलिसी सुरू केली.
सर्वांना रायफल बाळगणे बंधनकारक
> येथे 24 तास पोलार बेअर (अस्वल) हल्ल्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वांना हायटेक रायफल ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
> माणसांची लोकसंख्या 2000 असताना येथे 3000 पोलार बेअर राहतात. घराबाहेर पडणारा प्रत्येक स्थानिक आपल्यासोबत रायफल घेऊनच पडतो.
> मात्र, कार्यालयात गेल्यानंतर कुणालाही रायफल बाळगण्याची परवानगी नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.