आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Father, Who Travels 12 Km Every Day, Leaves 3 Girls At School, Is Being Appreciated On Social Media

रोज 12 किलोमीटरचा प्रवास करुन 3 मुलींना शाळेत सोडतात वडील, सोशल मीडियावर होत आहे कौतुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिया खानची गोष्ट एनजीओ स्वीडिश कमेटी फॉर अफगानिस्तानने सोशल मीडियावर शेअर केली

काबुल- अफगानिस्तानमध्ये मुली आणि महिलांप्रती लोकांचे विचार बदलत आहेत. याचेच एक ताजे उदाहरण मिया खान आहेत. ते आपल्या मुलींना शिकवण्यासाठी रोज 12 किलीमीटर जातात आणि मुलींचा क्लास संपेपर्यंत 4 तास त्यांची वाट पाहतात. एनजीओ स्वीडिश कमेटी फॉर अफगानिस्तानने ही माहिती जगासमोर आणली.
या एनजीओने मिया खानची गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली. मिया आपल्या कुटुंबासोबत अफगानिस्तानच्या शारानामध्ये राहतात. अनेकजण मिया यांच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. मिया खान यांनी म्हणाले की, "मी अशिक्षीत आहे. मजुरी करून कुटुंबाचे पोट भरतो. आमच्या परिसरात कोणतीच महिला डॉक्टर नाहीये, त्यामुळे मला माझ्या मुलींना डॉक्टर बनवायचे आहे."