आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या मृत्यूचे पाचवे सर्वात मोठे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शीर्षक वाचून विचारात पडला असाल की असा कोणता आजार आहे की जो जगभरातल्या महिलांच्या मृत्यूचे मोठे कारण आहे. तर ते कारण आहे की मासिक पाळी. मासिक पाळीविषयी पुरेशी माहिती नसणं, त्या काळात सुरक्षित पद्धतीने स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे माहिती नसणं अशी आरोग्याशी निगडित कारणं त्यामागे आहेत. दसरा नावाच्या एका एनजीओच्या रिपोर्टनुसार २३ दशलक्ष मुली या मासिक पाळीच्या काळात शाळा सोडतात. कारण, मुलींना शाळेत मासिक पाळीच्या दरम्यान आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. अनहायजिनिक, असुरक्षित साधनांच्या वापरामुळे मुली व महिला मासिक पाळीच्या काळात संक्रमणग्रस्त होतात. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, योग्य पद्धतीने कापड, पॅड किंवा मेन्स्ट्रुएशन कप याचा वापर आणि या गोष्टी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. असुरक्षित, अस्वच्छ साधनांच्या वापरामुळे अनेक मुली, आणि स्त्रिया या विविध आजारांच्या बळी पडतात. युरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन, वजायनल कॅन्सर अशा अनेक आजार महिलांना जडतात. या एनजीओनं दर्शवलेले हे आकडे गंभीर आहेत. महिलांच्या मृत्यूचा आठ लाख हा आकडा नक्कीच चिंता करायला लावणारा आहे. कारण हा आकडा आज एकविसाव्या शतकातही महिलांच्या आरोग्याबाबत किती निष्काळजीपणा आहे हे दर्शवतो.

बातम्या आणखी आहेत...