आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Film 'jungle Cry' Is Based On Real Incident, There Are Real Heroes Have Taken In The Film

सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट 'जंगल क्राय', चित्रपटात खऱ्या नायकांचीच केली गेली निवड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गेल्या एक वर्षापासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेला अभय देओल लवकरच रग्बीवर आधारित चित्रपट 'जंगल क्राय'मधून पुनरागमन करणार आहे. सागर बेल्लारी दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत एमली शहा दिसणार आहे. सध्या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. याचे पोस्टर आणि ट्रेलर पाहून ओडिशा सरकारने याला टॅक्स फ्री करण्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त ब्रिटश संसदेत निर्माते-दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर यंदा जपानमध्ये होणाऱ्या रग्बी वर्ल्डकपमध्ये जापान सरकारने चित्रपटाचा प्रीमियर करण्याचा विचार केला आहे. 
 
सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट : हा एक बायोपिक नाही, मात्र सत्य घटनेवर आधारित आहे. बायोपिक एका माणसांवर आधारित आहे मात्र ही कथा अनेक लोकांची आहे. याची सुरुवात ओडिशाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अच्युता सामंतापासून सुरू होते. ते जेव्हा चार वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले. घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती. खायला-प्यायला वेळवर मिळत नव्हते. अशा परिस्थितीतही ते शिकले आणि इंजिनिअर बनले. आज त्यांच्या संस्थेत ३० हजार अनाथ, आदिवासी, गरजू मुले मोफत शिक्षण घेत आहेत. खेळाची आवड असणाऱ्या मुलांनाही ते येथे आणून शिकवतात. या मुलांचा इंग्लंडमध्ये चार देशांसोबत रग्बी मॅच होतो आणि ते कशा प्रकारे खेळ जिंकतात, यावर कथा आधारित आहे. अभय देओल कोच रुद्राक्ष जीना आणि एमली शहा फिजियोथेरपिस्टच्या भूमिकेत आहेत. 
 

चित्रपटासंबंधी काही खास गोष्टी 
- इंग्लंडमध्ये शूट होऊनही हा चित्रपट फक्त २५ कोटींमध्ये बनला आहे. याचे ४० टक्के शूटिंग भारतात आणि ६० टक्के शूटिंग विदेशात झााले. 
- सध्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. दीड वर्षात बनला चित्रपट 
- रग्बी सामन्याच्या भागात शूटिंगदरम्यान मॅच पाहण्यासाठी १००० ते १५०० लोकांना बोलावण्यात आले होते. ते खरे प्रेक्षक होते. फायनल मॅचमध्ये १२ हजार लोक दिसतील. 
 

चित्रपटाला मिळालेली उपलब्धी 
- ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या रग्बी वर्ल्डकपमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित केला जाणार आहे. 
- हा पहिला चित्रपट आहे ज्याला ब्रिटिश संसदेत सन्मानित करण्यात आले. 
- चित्रपटाला ओडिशा सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला. 
 

व्हिसा न मिळाल्यामुळे थांबले होते शूटिंग 
यात रग्बी टीमच्या खेळाडूची भूमिका त्याच मूळ आदिवासी मुलांनी साकारली आहे, जे संस्थेत शिकतात. काही पात्र सोडले तर बाकीचे मूळ पात्र आहेत कोणीच कलाकार नाहीत. चित्रपटासाठी जवळजवळ १०० मुलांची निवड करण्यात आली होती. शूटिंगसाठी जेव्हा निर्माते जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा अनाथ असल्यामुळे त्यांना व्हिसा मिळाला नाही. तेव्हा त्यांनी इंग्लंडच्या मंत्र्यांना भेटून आपले म्हणणे मांडले. त्यांनी संसदेत बैठक घेऊन अॅप्रूव्हल देण्याचे वचन दिले आणि तसेच केलेदेखील. यामुळे शूटिंग एक आठवडा थांबले होते. 
 

प्रेक्षकांपर्यंत कथा पोहोचायला हवी 
फक्त चार महिन्यांत तयारी करून रग्बी खेळायला इंग्लंडला जाणाऱ्या मुलांची ही कथा. या वेळी या मुलांकडे चांगले कपडे आणि बूट नव्हते. तरीदेखील त्यांनी विश्वकप जिंकला. कारण त्या वेळी टी-२० विश्वकप सुरू होता. त्यामुळे मीडियात हे कव्हरेज आले नाही. मी जेव्हा ऐकले तेव्हा लोकांपर्यंत ही कथा पोहोचायला हवी, असे वाटले. प्रशांत शहा, निर्माते 
 

'इंशाल्लाह'साठी भन्साळीने बोलावले 
निर्माते प्रशांत शहा यांचा प्रॉडक्शन सेटअप अमेरिकेत आहे. त्यांनी सांगितले, मोठ्या स्टारच्या चित्रपटाचे शूटिंग हाेते तेव्हा माझी कंपनी त्यांना प्रॉडक्शनचे सामान उपलब्ध करून देते. नुकतेच भन्साळीने 'इंशाल्लाह' साठी मला बोलावले आहे. 

बातम्या आणखी आहेत...