आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोयाने वाया घालवला वेळ, क्रिकेटच्या नावाखाली प्रेक्षकांसमोर सादर केली निकृष्ठ दर्जाची कलाकृती  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेटिंग  -  1.5 / 5  स्टारकास्ट     -  सोनम कपूर, दलकीर सलमान  दिग्दर्शक  -  अभिषेक शर्मा  निर्माता  -  पूजा शेट्‌टी, आरती शेट्‌टी  म्यूझिक डायरेक्टर  -  शंकर एहसान लॉय  जॉनर  -  रोमँटिक  वेळ  -  136 मिनिटे    

बॉलिवूड डेस्क : विश्वास नाही बसत हा चित्रपट ‘तेरे बिन लादेन’ सारखा चित्रपट बनवणाऱ्या अभिषेक शर्मानेच हा चित्रपट बनवला आहे. याचे टायटल तर ‘द जोया फॅक्टर’ आहे. पण हे वेळ, पैसे आणि एनर्जी तीनही वाया घालवते. वेस्टमध्ये तर बेस्ट सेलिंग पुस्तकांवर उत्तमोत्तम चित्रपट बनतात. पण येथे अनुजा चौहानच्या पुस्तकावर बनलेल्या चित्रपटाचे अडाप्टेशन स्तरहीन आहे.  

ना मनोरंजन ना बांधून ठेवणारी कथा... 
संपूर्ण चित्रपटात सिद्धुची मिमिक्री करत असलेल्या कमेंटेटेरच्या व्हॉइस ओव्हरशिवाय चित्रपटात शाहरूख खानचा आवाजदेखील बॅकग्राउंडमध्ये आहे. मात्र तोही चित्रपटाला मनोरंजक आणि एंगेजिंग बनवू शकला नाही. कपूर कुटुंबातील तीन कलाकार सोनम, अनिल आणि संजय कपूर हेदेखील चित्रपटात आहेत. पण कशामुळेच चित्रपटाचे प्रदर्शन उत्तम झाले नाही. महत्वाची गोष्ट ही आहे की, चित्रपटाचा प्लॉटच यशाचे श्रेय नशीब की मेहनत या दोघांमध्ये झुलत राहातो. 
जोया सोलंकी ती व्यक्ती आहे, जिचे नशीब आणि उपस्थितीमुळे टीम इंडिया क्रिकेटच्या मॅचेस जिंकू लागते. त्यामुळे क्रिकेट बोर्ड तिच्याशी टीमचा लकी चार्म बनण्याचे कॉन्ट्रॅक्ट बनवते. जोयाचे पिता आणि भाऊ सैन्यात असतात. पण क्रिकेटचे क्रेझी फॅन आहेत. एवढे की, संपूर्ण चित्रपटात ते युद्धाच्या मैदानात एकदाही दिसत नाही पण टीव्हीसमोर क्रिकेट पाहण्यासाठी सदैव बसलेले असतात. इकडे योगायोगाने टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत पोहोचते.  

निखिल खोडा टीम इंडियाचा कर्णधार आहे. तो मानतो की, यश मेहनतीने मिळते, नशिबाने नाही. सुरुवातीच्या तक्रारीनंतर जोया आणि निखिल प्रेमात पडतात. तरीही निखिलचा तर्क आहे की, जोया टीमसोबत असल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळेल. मेहनतीपेक्षा नशिबाच्या भरवश्यावर बसतील. मात्र निखिलचे काहीही चालत नाही. लेडी लक म्हणत जोयाला सोबतच ठेवले जाते. फायनली काय होते, चित्रपट त्याबद्दलच आहे.  

येथे अभिषेक शर्माने नशिबाची थट्टा करण्याच्या नादात चित्रपटाचा विनोद केला आहे. ज्या क्रिकेटला भारतामध्ये धर्माचा दर्जा दिला जातो, त्यातील खेळाडूंचे निकृष्ट दर्जाचे डुप्लिकेट्स चित्रपटात दाखवले आहे.  

चित्रपट ना इमोशन आहे. ना मेहनत आणि नशिबाच्या डिबेटला उत्तमप्रकारे संवांसमोर मांडू शकला आहे. गीत-संगीत खूप साधारण आहे. सोनम कपूर आणि दलकीर सलमान सह संजय कपूर, सिकंदर खेर, अंगद बेदी, मनु ऋषी चड्ढा सर्वांचा सरासरी अभिनय दिसला. डायरेक्टर आणि रायटरने क्रिकेटच्या नावाखाली प्रेक्षकांसमोर निकृष्ठ दर्जाची कलाकृती सादर केली आहे. याचे टायटल जोया नाही जाया फॅक्टर असायला हवे.