आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Film Will Be Made On Kashmir's Last Hindu Queen 'Kota', Producer Said 'It Is A Shame Not To Know About Her'

काश्मीरच्या शेवटच्या हिंदू राणी 'कोटा' यांच्यावर बनणार चित्रपट, प्रोड्यूसर म्हणाला - 'त्यांच्याविषयी माहिती नसणे लाजिरवाणी बाब आहे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कोटा' राणीचा फोटो राकेश के. कौल यांची बुक 'द लास्ट क्वीन ऑफ काश्मीर' च्या कव्हरवरून आणि निर्माते मधु मंतेना - Divya Marathi
'कोटा' राणीचा फोटो राकेश के. कौल यांची बुक 'द लास्ट क्वीन ऑफ काश्मीर' च्या कव्हरवरून आणि निर्माते मधु मंतेना

बॉलिवूड डेस्क : रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि फँटम फिल्म्सने काश्मीरच्या शेवटच्या हिंदू महाराणी 'कोटा' यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. 14 व्या शतकातील काश्मीरी महाराणी 'कोटा' यांनी त्यांच्या असामान्य सौंदर्यासोबतच कुशल प्रशासन आणि सैन्य रणनीतीसाठी ओळखले जायचे. चित्रपटाचे को-प्रोड्यूसर मधु मंतेनाने यावर आश्चर्य व्यक्त केले की, भारतीय 'कोटा' राणी यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल फारसे कुणाला काही माहित नाही.  
 

'आजच्या घटना राणीशी संबंधित'
मंतेना म्हणाला, "जर 'कोटा' राणीची तुलना इजिप्टच्या क्लियोपॅट्रासोबत केली गेली तर ही अतिशयोक्ती ठरणार नाही. आज काश्मीरमध्ये जे काही होत आहे, त्याचा सरळ सरळ संबंध 'कोटा' राणीशी आहे. त्यांचे आयुष्य खूप नाट्यमय होते आणि कदाचित त्या भारतातील सर्वात सक्षम महिला शासक होत्या. जर त्यांच्याविषयी जाणून घेतले नाही तर ती खूप लाजिरवाणी बाब असेल."
 

लोकांपर्यंत राणीची कथा पोहोचवणे असेल ध्येय...  
रिलायन्स एंटरटेन्मेंटचे ग्रुप सीईओ शिवाशीष सरकार म्हणाले की, चित्रपटाचा मुख्य उद्द्येश राणीची कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. ते म्हणाले, "त्यांच्या भूमिकेत अनेक शेड्स आहेत. यामध्ये काहीही शंका नाही की, त्या आपल्या देशातील खूप महत्वाच्या महिला होत्या. पण त्यांच्याबद्दल कमी लोकांना माहित आहे. आमचा चित्रपट बिग बजेट असेल." मात्र अद्याप चित्रपटाची स्टारकास्ट आणि डायरेक्टरबद्दल कोणतीही घोषणा झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...